Raj -Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दोन्ही नेते सकारात्मक, तुम्हाला लवकरच....', राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राऊतांचं मोठं विधान

Raj -Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच ठाकरे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. 'दोन्ही नेते सकारात्मक असून लवकरच तुम्हाला फळ दिसेल.', असे राऊत म्हणाले.

Priya More

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येण्याबाबत पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात या चर्चा रंगल्या असून आता यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. अमित ठाकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना दोन्ही नेत्यांकडे एकमेकांचे नंबर आहेत. युती करण्याची इच्छा असेल तर त्यांनी फोन करून बोलावे. आम्ही यावर बोलून काीच फरक पडणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात मोठं विधान केले आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले. ते म्हणाले की, 'आम्ही सकारात्मक आहोत म्हणून कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे समजून कसं घेत नाही. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांचे सहकारी देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा झाला असेल त्याच्यामध्ये चिंतेचा कारण काय?'

मनसे नेते अमित ठाकरे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'हे जे मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्मापासून हे आधी दोन भाऊ आहेत. मी या दोघांनाही पाहिलं आहे. जाहीरपणे मी आता १० मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरे यांना फोन करतो असं सोशल मीडियावर सांगितल्यावर कोणी एकमेकांना फोन करत नाही फोन झाले सुद्धा असतील. मी नेहमी सांगतो की तुम्हाला फळ दिसण्याशी मतलब आहे.

तसंच, 'तुम्हाला लवकर फळ दिसेल. फळ झाडावरती यायला आधी बी लावावे लागते. मग पाणी द्यावे लागते. मग वाढवावे लागते. मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियेतून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत तुम्ही असं देखील म्हणा झाडाला खूपच फळ आली आहेत. अमित ठाकरे मी यांना त्यांच्या जन्मापासून पाहिलं. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्यांची विधानही फार गोड आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनेचे काका म्हणून स्वागत करतो त्यांचे विधान चांगले आहे. मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही. आमच्यासाठी ते दुसरं घरचं आहे.', असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT