Uddhav-Raj Thackeray Alliance : 'ठाकरे दिलसे एकत्र येणार', राऊतांनी दिले युतीचे संकेत; युतीसाठी ठाकरेंवर जनतेचं प्रेशर

Sanjay Raut on Uddhav Raj Thackeray Alliance : विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर महापालिका निवडणुकीपुर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साद घातली. तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना प्रतिसाद दिला.
Sanjay Raut hints at Uddhav Raj Thackeray alliance
Sanjay Raut hints at Uddhav Raj Thackeray allianceSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : साद-प्रतिसाद नाट्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले आहेत. दरम्यान परदेश दौरे झाले. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश गेले..आता पुन्हा चर्चा नव्याने सुरू झालीय. आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य. महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवायचा प्रयत्न सुरु असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. या वक्तव्याचा आधार घेत संजय राऊतांनी थेट मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेतच दिलेत.

विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर महापालिका निवडणुकीपुर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साद घातली. तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना प्रतिसाद दिला. मात्र दोन्ही ठाकरे परदेश दौऱ्यावर गेल्यानं युतीच्या चर्चा बारगळल्या. आता दोन्ही ठाकरे मुंबईत आहेत. "ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हा ब्रँड संपणार नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. त्यामुळेच पुन्हा मनसे-शिवसेना युतीच्या चर्चा रंगल्यात. मात्र ही युती नेमकी कधी होणार? याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय.

Sanjay Raut hints at Uddhav Raj Thackeray alliance
Vaishnavi Hagawane Death : वैष्णवीची आत्महत्या नाही खूनच? रिमांड कॉपीतून हत्येचा खुलासा? आरोपींच्या कृत्याची होणार चौकशी

मात्र आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा कधी झाल्या?

2012

कौटूंबिक संबंध सुधारल्यानं एकत्र येण्याच्या चर्चा

2019

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपविरोधात भूमिका घेतल्यानं युतीच्या चर्चा

2022

शिवसेना फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन

2024

विधानसभेतील पराभवानंतर एकत्र येण्याची चर्चा

आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या वारंवार चर्चा झाल्या आहेत. मात्र ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. आता विधानसभेला मोठा दणका बसल्यामुळेच शेवटी ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी एकत्र येणं हाच दोन्ही बंधूंसमोर पर्याय आहे. आता ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी एकत्र येणार की पुन्हा एकला चलो चा नारा देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Sanjay Raut hints at Uddhav Raj Thackeray alliance
Rahuri to Shani Shingnapur : मोठी बातमी! राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता, ४९४ कोटी रुपयांचा खर्चही मंजूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com