Hitendra Thakur Saam Tv
मुंबई/पुणे

Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर वसईतून लढणार, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर केली घोषणा

Maharashtra Assembly Election 2024 : हितेंद्र ठाकूर यांनी वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Satish Kengar

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी रविवारी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. पक्षाचे नेते राजीव पाटील यांनी केलेलं बंड शमल्यानंतर रविवारी बहुजन विकास आघाडीचा पहिला कार्यकर्ता मेळावा विरारमध्ये संपन्न झाला.

या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईतुन लढावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. राजीव पाटील यांनी बंड केले नव्हते ते त्या विरोधक आणि माध्यमांनी वावडया उठवल्या होत्या, असेही ठाकूर यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचा मेळावा रविवारी विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात संपूर्ण वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. २०१९ ची निवडणूक जिंकल्या नंतर हितेद्र ठाकूर यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यानी केली. ठाकूर यांचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर वसईतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘वसईचा आमदार मीच असणार’ असे त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वसई, नालासोपारा आणि बोईसर या ३ जागांबरोबर पालघर जिल्ह्यातही उमेदवार उभे करून जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT