Maharashtra Politics: मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?

Dilip Walse Patil: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांनी पवार हेच आपल्या मनात असल्याचं वक्तव्य केलंय.
मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?
Dilip Walse PatilSaam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जाहीर सभेत आपण शरद पवारांना सोडलं नसल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर शरद पवार आपल्या मनात असल्याचं वक्तव्य वळसे पाटलांनी केलंय. त्यावरून विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. तर निवडणूक तोंडावर असल्याने वळसे पाटलांनी वक्तव्य केल्याचा टोला रोहित पवारांनी लगावलाय.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत की, साहेबांना सोडलं नाही, साहेब आमच्या मनात. यावर रोहित पवार म्हणाले की, निवडणूक तोंडावर असल्याने साहेबांची आठवण झाली.

मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?
BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनीच पवारांची साथ सोडल्याने ते टीकेचे धनी झाले होते. त्यानंतर वळसे पाटलांनी पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या. तर आता वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात, असं म्हणत वळसे पाटलांनी सुचक वक्तव्य केलंय. मात्र वळसे पाटील हेच नाही तर दादांसह अनेक नेत्यांनी शरद पवार आपले दैवत असल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं चित्रंय. नेमक्या कोणत्या नेत्यांनी पवारांचा दैवत असा उल्लेख केलाय? ते जाणून घेऊ...

  • अजित पवारांकडून करमाळ्याच्या सभेत पवारांचा दैवत असा उल्लेख.

  • पवारांविषयी बोलताना हसन मुश्रीफांकडून दैवत असा उल्लेख.

  • छगन भुजबळांकडूनही पवार दैवत असल्याचं वक्तव्य.

  • नरहरी झिरवळांकडून पवारांचा दैवत, असा उल्लेख.

मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?
BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसोबतच्या नेत्यांनी थेटपणे पवारांवर टीका करणं टाळलंय... तर दादांच्या नेत्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करत पवारांच्या निष्ठावंतांना साद घातलीय. त्यामुळे दादांच्या नेत्यांचा पवारांविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर त्यांना विधानसभेला फायद्याचा ठरणार की तोट्याचा? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com