Hindi Language Controversy update Saam tv
मुंबई/पुणे

Hindi Language Controversy : मुंबईनंतर पुण्यात हिंदी भाषेवरून वाद; गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत गोंधळ, नेमकं काय घडलं? VIDEO

Hindi Language Controversy update : पुणे गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत गोंधळ उडाला. या बैठकीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : मुंबईनंतर आता पुण्यात हिंदी भाषेवरून वाद उफाळल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सव मंडळ नियोजन बैठकीत गोंधळ झाला. या बैठकीत एक व्यक्ती हिंदी बोलत असल्याने गोंधळ झाल्याची माहिती हाती आली आहे. बैठकीतील गोंधळाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मंडळ आणि पुणे पालिका प्रशासनाने बैठकीचं आयोजन आज सोमवारी आयोजित करण्यात आलं होतं. या पुणे गणेशोत्सव मंडळ नियोजन बैठकीत काहीसा गोंधळ उडाला. पुणे महानगरपालिका आणि गणेश मंडळ कार्यकर्ते व्यतिरिक्त नागरिक बैठकीत आले होते. या बैठकीत याच नागरिकांनी बोलायला सुरुवात केल्याने गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता नसलेला व्यक्ती हिंदी बोलत असल्याने गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

गणेश मंडळ आणि पालिका प्रशासनाची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत गणेश मंडळाचा कार्यकर्ता नसलेला व्यक्ती बोलू लागला. हा व्यक्ती गणेश उत्सवाचा विषय सोडून दुसराच विषय बोलू लागला. यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. यामुळे त्या व्यक्तीला बैठकीतून बाहेर काढले. गणेश उत्सव सोडून इतर विषयावर बोलू लागल्याने इतर मंडळांचा वेळ वाया जात असल्याने गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

बैठकीत काय चर्चा झाली?

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिकेत महापालिका आयुक्त पोलीस प्रशासन आणि पुण्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांच्यामध्ये एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत विसर्जन मिरवणुकीच्या वेळा, पुणे शहरातील वाहतूक कोंडी, आवाजाची मर्यादा, महापालिकेकडून होणारा सन्मान, गणेश मंडळांच्या समस्या याविषयी चर्चा झाली. शहरातील विविध गणेश मंडळांनी त्यांच्या समस्या आणि काही सूचना यावेळी प्रशासनासमोर मांडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

SCROLL FOR NEXT