Pahalgam Terror Attack Saam tv
मुंबई/पुणे

Pahalgam Terror Attack : मुलाची दहावीची परीक्षा झाली म्हणून कुटुंबासोबत फिरायला गेले, अन् परतलेच नाहीत, डोंबिवलीत शोककळा

Terror Attack Kashmir: डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू. मुलाची दहावी परीक्षा झाली म्हणून कुटुंबासोबत गेले होते फिरायला. डोंबिवलीत शोककळा.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Hemant Joshi Dombivli News : काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी एके ४७ बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाचा बाप, कुणाचा नवरा तर कुणाचा मुलगा गेला. दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरलाय. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये डोंबिवलीमधील हेमंत जोशी यांचाही समावेश आहे. मुलाची दहावाची परीक्षा झाली म्हणून हेमंत जोशी कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डोंबिवलीत शोककळा पसरली आहे.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

हल्ल्याची बातमी समजताच रहिवाशांनी जोशी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचे स्टेटस पाहिले मात्र मेसेज पाठवला मात्र मेसेज डिलीव्हरच झाला नसल्याचे त्यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले. जोशी यांच्या निधनाची बातमी खरी आहे का? हे तपासण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले , जोशी यांच्या सासऱ्यांना भेटले तेव्हा त्यांना ही बातमी खरी असल्याचे समजले . त्यांच्या शेजारी राहणारे पाचपांडे यांनी जोशी यांच्या सासऱ्यांची संपर्क साधला असता त्यांच्या सासऱ्याने ध्रुवने पाच वाजता आम्ही सुखरूप असल्याचा मेसेज पाठवल्याची माहिती दिल्याचे सांगितले.

इमारतीतील रहिवाशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. सर्वसामान्य माणूस भारतात सुरक्षित आहे का ? काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यावर गोळीबार होतो. त्यामुळे भारतात आम्ही सुरक्षित आहोत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT