Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानचा, सैफुल्लाह खालिद कोण?

saifullah khalid mastermind : पहलगाम हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू. TRF संघटनेचा सैफुल्लाह खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे उघड. पाकिस्तानचा TRF संघटनेस पाठिंबा असल्याची माहिती.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack सोशल मीडिया
Published On

Pahalgam terror attack saifullah khalid mastermind : दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २८ जणांचा जीव घेतलाय. या भ्याड हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने काश्मीरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. काश्मीरमधील दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्याने देश हादरला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंडचे नावही समोर आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाची संघटना TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) ने घेतली आहे.

हल्ल्यामागील मास्टरमाइंड

पहलगाममधील हल्ल्यामागे पाकिस्तानचा सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कसूरी हा कुख्यात दहशतवादी आहे. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तैयबाचा उप प्रमुख आहे, त्याशिवाय हाफिज सईद याचा विश्वासू आहे. सैफुल्लाह याचा भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, सैफुल्लाह सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि TRF च्या दहशतवादी कारवायांचे संचालन करत आहे. तो पाकस्तानमधून लष्करी कारमधून फिरतो. सैफुल्लाह याच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित, सशस्त्र दहशतवादी तैनात असतात. पाकिस्तानात तो लष्कराच्या संरक्षणाखाली आणि ISI च्या पाठबळाने मोकाट फिरतो. सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तामधील लष्कराचे अधिकारी फुलांचा वर्षाव करतात.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याचा भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघांचा समावेश

भारतविरोधी कारवाया -

सैफुल्लाहला याला नुकतेच पाकिस्तानच्या कंगनपूर येथे स्पॉट केले होते. पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खटक यांनी त्याला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सैफुल्लाहने भारतविरोधी द्वेष पसरवणारे भाषण केले होते. भारताविरोधात दहशत पसरवण्याची उघड धमकी दिली होती.

दोन महिन्याआधी भडक भाषण -

पाकिस्तानी लष्कर आणि ISI यांनी घेतलेल्या सभेत सैफुल्लाह खालिद याने उघड धमकी दिली होती. तो म्हणाला होता, “आज २ फेब्रुवारी २०२५ आहे, आणि मी वचन देतो की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. येत्या काही महिन्यांत आमचे मुजाहिद्दीन हल्ले तीव्र करतील.”

या सभेला मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे या संपूर्ण कटात पाकिस्तान सहभागी असल्याचा संशय व्यक्त होतो.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील ३ भावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

दहशतवाद्यांना ट्रेनिंग -

सैफुल्लाहने एबटाबादच्या जंगलात आयोजित दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात तरुणांना प्रशिक्षित केले. हत्या, आत्मघाती हल्ले आणि घुसखोरीच्या रणनीती त्याने शिकवल्याची माहिती आहे. पाकिस्तानी लष्कर आणि ISI च्या मदतीने या दहशतवाद्यांना सीमेपलीकडे घुसखोरी करण्याची योजना आखली गेली होती. त्यानंतरच हा भ्याड हल्ला केल्याचे बोलले जातेय.

३७० रद्द झाल्यानंतर....

२०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर ISI ने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) ही संघटना स्थापन केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर लष्कर-ए-तैयबाचं नाव न येता दहशतवाद्या कारवाया करण्यासाठी ही संघटना स्थापन केली होती. भारताच्या गृह मंत्रालयाने TRF ला लष्कर-ए-तैयबाचीच संघटना म्हणून घोषीत केली. लष्करचा पैसा, हत्यारे आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधांचा वापर ही संघटना करतेय.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : नाव विचारलं अन् IB अधिकाऱ्यावर धाडधाड गोळीबार केला, कुटुंबासमोरच घेतला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com