helmet rule for police in Maharashtra Saam
मुंबई/पुणे

पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती, कायदा मोडला तर थेट कारवाई, वाचा नेमका नियम काय?

Helmet Rule for Police & Govt Employees: महाराष्ट्रात पोलिस आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियम मोडल्यास ५०० रुपयांचा दंड आणि कडक कारवाई होणार असून सीसीटीव्हीद्वारे देखरेख वाढवली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

helmet rule for police in Maharashtra : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणं अनिवार्य आहे. पण पोलिस आणि सरकारी कर्मचारी हेल्मेट वापरत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. आता पोलिसांनाही दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरण बंधनकारक करण्यात आले आहे. नुकतेच राज्य डीजीपी कार्यालयाने याबबतचे एक परिपत्रक जारी केले आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई आणि नागपूर वगळता राज्यातील इतर भागांतील पोलीस कर्मचारी अनेकदा हेल्मेट घालत नाहीत. त्या सर्वांनी हेल्मेट वापरणं आता बंधनंकारक कऱण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी असो अथवा पोलिस सर्वांनी हेल्मेट वापरावेच, असे स्पष्ट सांगण्यात आलेय. (Maharashtra Police mandates helmets: Strict new rules for officers)

मागील वर्षभरात राज्यात रस्ते अपघातात १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सात हजारांच्या आसपास दुचाकीचालक आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना अनेकजण हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पण आता यापुढे सर्वांना हेल्मेट वापर करावाच लागणार आहे. कायद्याची अंमलबाजावणी करणाऱ्या पोलिसांनाही हेल्मेट वापरावेच लागणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि दंड आकारण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्याची योजनाही पोलिसांची आहे. हेल्मेट वापरल्याने प्राणातिंक अपघाताची व गंभीर दुखापताची शक्यता कमी असते.

मुंबई आणि नागपूर वगळता राज्यातील इतर शहर-जिल्ह्यात फक्त २० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रेणेने कठोर कारवाई करावी. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी आधी हेल्मेट वापरावे, अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होईल, असे नव्या आदेशात म्हटले आहे. नागपूरमध्ये नुकतीच राज्यातील सर्वच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर अपर पोलिस महासंचालकांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

हेल्मेट वापरून पोलिसांनी आदर्श घालून दिला पाहिजे. पुणे शहरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेटचा नियम लागू करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. त्यांनी नागरिकांनाही हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, कोणताही पोलीस कर्मचारी हेल्मेटशिवाय वाहन चालवताना दिसल्यास त्याची माहिती द्यावी. पुणे वाहतूक पोलीस (पीटीपी) ॲप्लिकेशनचा वापर करून, हेल्मेट न घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांच्या दुचाकींच्या नोंदणी क्रमांकासह फोटो काढावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

वाहतूक कायदा ‘कलम-१९४ डी’नुसार प्रत्येक दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होतो. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातलेल्या अधिकारी, अंमलदारांचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यास अथवा माहिती मिळाल्यास त्या अधिकारी किंवा अंमलदाराकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्यांनी जाणूनबुजून कायदा मोडल्याची नोंद सेवापुस्तकात देखील केली जाईल, असा इशारा अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी रात्री उशीरा शरीर देतं ही संकेत; पाहा काय आहेत लक्षणं

Ladki Bahin Yojana: एप्रिलचे १५ दिवस उलटले, अजून मार्चचा हप्ता जमा नाही; लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार का?

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Famous Actor Wedding : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाची तारीख सांगत होणाऱ्या बायकोसोबतचा रोमँटिक फोटो शेअर

Who Is Praful Hinge: राजस्थानचा गेम करणारा प्रफुल्ल हिंगे आहे तरी कोण? ज्यानं IPLच्या पदार्पणात रचला इतिहास

SCROLL FOR NEXT