LPG cylinder blast family death news : किचनमध्ये गॅसवर स्वयंपाक बनवला जात होता, पण त्याचवेळी अचानक एलपीजी सिलिंडरचा ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट इतका भयंकर होता की क्षणात संपूर्ण घरात आग भडकली. या भीषण आगीमध्ये ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. आई-बाप आणि फक्त ३ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिहारमधील दरभंगाच्या संदुरपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
महिला किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्यावेळी अचानक सिलिंडरला आग लागली अन् मोठा ब्लास्ट झाला. सिलिंडरचा ब्लास्ट झाल्यानंतर काही क्षणातच आग संपूर्ण घरात पसरली अन् आगीच्या ज्वाला अन् धुराचे लोट पसरले. या भयंकर आगीमध्ये ३ महिन्याच्या बाळाचा होरपळून मृत्यू झाला. तर आई आणि बापही जिवंत जळाले. या दुर्दैवी घटनेनंतर संदुरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पती गोविंद, पत्नी ऋषी कुमारी आणि त्यांच्या ३ महिन्याच्या बाळाचा मृतकांमध्ये समावेश आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे कुटुंबातील इतर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीच्या उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या.
जिल्हा आपत्ती अधिकारी सलीम अख्तर यांनीही स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागल्याची माहिती मिळताच संदुरपूर परिसरात आक्रोश झाला. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळावर दाखल झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. जिल्ह्याचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अन् मदतकार्य केले. स्थानिकांनी सांगितले की घरात नवीन किचन बसवण्यात आले होते. स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरला आग लागली अन् बॉम्बप्रमाणे मोठा स्फोट झाला. यात कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.