Heavy rains started in Pune city and central areas pune Ganeshotsav 2023 traffic updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Updates: पुण्यात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी; बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ

Pune Rain News: अचानक आलेल्या या पावसामुळे गणपती दर्शनाला घराबाहेर पडलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.

Satish Daud

Pune Rain Latest Updates

मंगळवारी रात्री पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पण बुधवारची पहाट उगवताच पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकर घराबाहेर पडले. मात्र, ११ वाजेच्या सुमारास पुण्यात पुन्हा ढग दाटून आलं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. (Latest Marathi News)

सध्या पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या सरी (Rain News) कोसळत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे गणपती दर्शनाला घराबाहेर पडलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं.

यामुळे वाहनचालकांची देखील मोठी दमछाक झाली. दरम्यान मंगळवारी शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत 26 मिमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर, पेठ परिसर, डेक्कन, कोथरुड, कर्वेनगर, विश्रांतवाडी, कात्रज, बाणेर, पाषाण, कोंढवा, सिंहगड रोड, लोहेगाव, हडपसर या भागात मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला.

रात्री उशिरापर्यंत पुण्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे गणपती बाप्पाच्या (Ganeshotsav 2023) दर्शनासाठी घराबाहेर पडणं पुणेकरांनी टाळलं. बुधवारची पहाट उगवताच शहरात पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. त्यामुळे अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी बुधवार पेठ, कसबा पेठेत दिसून आले.

मात्र, ११ वाजता पुन्हा पुण्यात पावसाला सुरुवात झाली. सध्या पुणे शहरासह मध्यवर्ती भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT