Maharashtra Government: अनुसूचित विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय,'या' वर्षापासून लागू होणार नवा नियम

Scheduled Caste Students Scholarship: महाराष्ट्र सरकारने इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची रक्कम वाढवली आहे. सुधारित शिष्यवृत्ती चालू शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाईल.
Scheduled Caste Students Scholarship:
State government increases Savitribai Phule Scholarship Scheme for Scheduled Caste students.saam tv
Published On
Summary
  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ.

  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ .

  • ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांना २५० रुपये, ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांना ४०० रुपये.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत राज्य शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ करत ५ वी ते ७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० रुपये, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

Scheduled Caste Students Scholarship:
कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर, वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

ही सुधारित वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दिली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी ही माहिती दिली.

Scheduled Caste Students Scholarship:
ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

सध्याची शिष्यवृत्तीची रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली. सध्या ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दरमहा ६० रुपये दिले जात आहे, मात्र आता दरमहा २५० रुपयांप्रमाणे देण्यात येतील, तर ८वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रुपयांवरून ४०० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला असल्याचं शिरसाट म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या आत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येणार असल्याचेही शिरसाट म्हणाले. पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मान्यता मिळताच यावर्षीपासून सुधारित शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com