Maharashtra Politics: शिंदे गटाचा मास्टर प्लान, ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस धाडणार; कारण काय?

Shivsena Latest News: ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाने मास्टर प्लान आखला आहे. ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस पाठवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.
Eknath Shinde Group will send notice 4 MP to  Uddhav Thackeray Group Maharashtra Politics
Eknath Shinde Group will send notice 4 MP to Uddhav Thackeray Group Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

एकीकडे शिवसेना कुणाची, १६ आमदार अपात्र की पात्र? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाने मास्टर प्लान आखला आहे.

ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस पाठवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. लवकरच या चारही खासदारांवर कारवाई केली जाणार, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Group will send notice 4 MP to  Uddhav Thackeray Group Maharashtra Politics
Shiv Sena News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होणार?

नुकतंच केंद्रातील मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. यासाठी संसदेत मतदानही घेण्यात आलं. या मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) चार खासदार अनुपस्थित होते.

त्यांनी अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णयही लोकसभा सचिवालयाला कळविला नसल्याचं सांगितलं जातंय. याच मुद्द्याला हाताशी धरून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या चार खासदारांना कोंडीत पकडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिंदे गटाने पत्रद्वारे सूचित केले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी १४ सप्टेंबरला व्हिप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हीपद्वारे म्हटलं होतं.

मात्र, विनायक राऊत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, संजय जाधव हे हजर नसल्याने त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच या चारही खासदारांना एक नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या या रणनितीला आता ठाकरे काय उत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Eknath Shinde Group will send notice 4 MP to  Uddhav Thackeray Group Maharashtra Politics
BJP News : भाजप या खासदारांचं तिकीट कापणार?, लोकसभेसाठी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com