BJP News : भाजप या खासदारांचं तिकीट कापणार?, लोकसभेसाठी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Political News : महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
Amit Shah Narendra Modi
Amit Shah Narendra Modi Saamtv
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोमाने तयारी सुरु केली आहे. भाजपने तर राज्यात मिशन ४५ सुरु केलं आहे. त्या दिशेने भाजपने काम करण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर भाजपचं बारीक लक्ष आहे. या सर्व बाबींचा विचार करुन राज्यात लोकसभा निवणुकीत भाजपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याचीही माहितकी सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.  (Latest Marathi News)

Amit Shah Narendra Modi
Saamana Editorial: 'द्वेष, सूड, बदला, फसवणूक, ही मोदी- शहांच्या भाजपची चतुःसूत्री...' सामनातून हल्लाबोल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. (Political News)

Amit Shah Narendra Modi
Sillod News: सामाजिक कार्यकर्त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह ५ जणांविरोधात गुन्हा

गणेशोत्सवानंतर भाजप अॅक्शन मोडवर

गणपतीनंतर भाजप अॅक्शन मोडवर येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ऑक्टोबरमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. भाजप प्रदेश कार्यकारणीची ३ ऑक्टोबरला मुंबईत ही बैठक पार पडणार आहे.

मिशन ४५+ च्या दृष्टीने कार्यकारिणीत चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची वसंत स्मृती येथे ही बैठक पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com