Kalyan Dombivli Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Dombivali Rain: ठाण्यासह कल्याण- डोंबिवली आणि बदलापूरमध्ये तुफान पाऊस, पाहा VIDEO

Heavy Rainfall In Thane Kalyan-Dombivli And Badlapur: कल्याण- डोंबिवलीत सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. कारण पावसामुळे अनेक ठिकाणचे नाले तुंबले आणि रस्त्यावर पाणी साचले आहे.

Priya More

ठाण्यापासून बदलापूरपर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. आजपासून याठिकाणी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून कल्याणमध्ये २५० पेक्षा जास्त घरामध्ये पाणी शिरले आहे.

कल्याण- डोंबिवलीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. कारण पावसामुळे अनेक ठिकाणचे नाले तुंबले आणि रस्त्यावर पाणी साचले आहे. कल्याण पूर्वेकडील पीसवली गावातील श्री कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी जलमय झाली आहे. याठिकाणी २५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नाला चुकीच्या पद्धतीने बांधल्याने घरामध्ये पाणी शिरल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. नागरिकांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

भिवंडीमध्ये सकाळपासूनच पाऊस पडत आहे. भिवंडीमध्ये सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर रिमझिम पावासाला सुरूवात झाली होती. आता याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. अचानक पावसाने जोर धरल्यामुळे भिवंडीकरांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले. भिवंडी शहरातील बाजारपेठ, भाजी मार्केट, तीन बत्ती नाका या भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ठाण्यामध्ये देखील सकाळपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठाणे शहराचा मध्यभाग असणाऱ्या पाचपाखाडी आणि नौपाडा परिसरात बत्तीगुल झाली आहे. गेल्या एक ते दीड तासांपासून बत्ती गुल झाल्याने ठाणेकर हैराण झाले आहे. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल याबाबत अद्याप काहीच माहिती देण्यात आली नाही.

पालघरमध्ये सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे. पश्चिम रेल्वेने बोईसर, पंचाळी, रमाईनगरला जोडण्यासाठी तयार केलेल्या अंडरग्राउंड बोगदा पाण्याने भरल्याने रमाईनगरला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. पंचाळी येथे तयार करण्यात आलेल्या अंडरग्राउंड बायपासला मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आले. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. पश्चिम रेल्वेच्या निष्काळजीपणाचा स्थानिकांना फटका बसत आहे. पहिल्याच पावसात गुडघावर पाणी साचल्याने रमाईनगर परिसरातील नागरिकांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT