अभिजीत देशमुख, कल्याण
डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून कल्याण- डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दाणादाण उडाली आहे. कल्याणच्या पिसवली गावातील सुमारे २०० ते २५० घरांमध्ये पाणी शिरले आहे.
कल्याण- डोंबिवली परिसरात सुरवातीला पाऊस झाला आहे. मात्र आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. साधारण दोन तासांपासून जोरदार पावसाच्या सारी कोसळत असून पावसामुळे कल्याण- डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचे (Rain) पाणी शिरले आहे. या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकास कामांमुळे बदलल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आलय आहेत. मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. घरातील वस्तूंचे नुकसान झालं. सध्या महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याची पाहणी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.