PM Pik Vima Scheme: एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, १५ जुलैपर्यंत मुदत

PM Crop Insurance Scheme Details in Marathi: नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६ पासून अंमलात आणली आहे.
PM Pik Vima Scheme: एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, १५ जुलैपर्यंत मुदत
Crop InsuranceSaam TV

परभणी : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी या वर्षी देखील पीक विमा योजना सुरु केली आहे. एक रुपयात पीक विमा उतरवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

PM Pik Vima Scheme: एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, १५ जुलैपर्यंत मुदत
Maval Accident : जुना मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, स्कूल बसला वाचवायच्या प्रयत्नात कंटेनर थेट दुकानात घुसला; महिलेचा मृत्यू

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६ पासून अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत गतवर्षीपासून राज्य शासनाच्या सहकार्याने (Parbhani) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपया भरून सर्वसमावेशक पीकविमा योजनेत सहभाग घेता येत आहे. या योजनेचा परभणी जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांना जवळपास ४८ कोटी ९० लाख रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) यंदाही एक रुपयात पीकविमा भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

PM Pik Vima Scheme: एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, १५ जुलैपर्यंत मुदत
Ghati Hospital : औषधी साठा असूनही डॉक्टरांकडून लिहून दिली जाते चिठ्ठी; घाटी रुग्णालयातील त्या डॉक्टरांवर होणार कारवाई

राज्य शासनाने २०२३ पासून सर्व समावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. हि नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com