Pune Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain News: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; सिंहगड रस्त्यावर गारपीट, नागरिकांची तारांबळ

Pune Rain News: पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Rain News: पुणे शहर परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील सिंहगड रोडवर मुसळधार पाऊस सुरू असून कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला आहे.अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याशिवाय कर्वेनगर आणि वारजे (Pune News) परिसरातही जोरदार गारपीट सुरू आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात दिवसा प्रचंड ऊन आणि रात्री प्रचंड गरमी जाणवत होती. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडाही चाळीशीमध्ये पोचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके अंगाला बसत होते. (Breaking Marathi News)

गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडाली. कोथरूड, आंबेगाव पठार, कर्वे नगर, वारजेसह शहराच्या इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.

काही ठिकाणी गारांचा पाऊस (Rain) देखील झाला. दिवसभर घामेघूम झालेल्या पुणेकरांना वरूणराजाच्या आगमनाने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगली तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढला असतानाच दुसरीकडे दररोज अनेक भागांमध्ये गारपीट आणि पाऊसही बरसतोय. या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. येत्या तीन-चार दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamanna Bhatia:'आज की रात' फेम तमन्ना भाटियाचा नवा लूक, फोटो तुफान व्हायरल

Shahapur : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; पाणी पुरवठा करणारे तीनही धरण ओव्हरफ्लो

Mumbai To Bhimashankar: मुंबईहून भीमाशंकरला कसे जायचे? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाचे सोपे पर्याय

Laughter Chefs 2 Winner: रिम- अली नाही तर या स्पर्धकांनी जिंकली लाफ्टरशेफची ट्रॉफी मिळाली इतक्या रुपयांचे बक्षिस

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात महायुतीत तणावाचे संकेत, जिल्हाध्यक्षांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT