Beed Unseasonal Rain: बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा कहर; वीज कोसळून २ महिलांसह ३ बैलांचा मृत्यू

Beed Rain News: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीने कहर सुरू केला आहे. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने चार दुर्घटना घडल्या आहेत.
Beed Rainfall Today
Beed Rainfall TodaySaam TV

Beed Rainfall Today: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीने कहर सुरू केला आहे. बुधवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने चार दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये विविध ठिकाणी वीज पडून 2 महिलांसह 3 बैल ठार झाले आहेत. या दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडल्या आहेत. (Latest Marathi News)

Beed Rainfall Today
Mumbai Crime: बाप नव्हे हा तर हैवान! दुसरं लग्न करता यावं म्हणून पोटच्या मुलालाच संपवलं; माहिमधील 'त्या' घटनेचा उलगडा

काजल विकास माळी (वय 23 रा.केरुळ ता. आष्टी) व राणी संदीपान सावंत (वय 35 रा. सांगवी ता.आष्टी) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या दोन घटनेसह तिसरी घटना ही तालुक्यातील पारगाव येथे घडली. येथील शेतकरी युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी वीज पडून दगावली आहे. (Breaking Marathi News)

तर चौथी घटना ही (Beed News) शिरुर कासार तालुक्यातील भडखेल येथे घडली आहे. येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडून दगावला आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने कहर सुरू केलाय.

Beed Rainfall Today
Beed News : नापिकी, कर्जाचे ओझे अन् आईचं आजारपण; अवघ्या ३२ वर्षीय शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

जवळपास दीड महिन्यात सात ते आठ वेळा गारपीट झाली आहे. यामुळे शेतकरी (Farmers) पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांचे घर संसार उघड्यावर आले आहेत. यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी सुरू झाल्याने आस्मानी संकट जिल्ह्यावर घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com