Palghar Rain News, Red Alert In Palghar, Palghar Rain Update, Palghar Rain Alert saam tvn
मुंबई/पुणे

Palghar Rain : तळई, दांडेकर, लिंगा पाडा गावांत पाणी शिरलं; धामणीतून विसर्ग सुरू

हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.

रुपेश पाटील

पालघर : गेले दाेन दिवस पालघर येथे मुसळधार पाऊस (Palghar Rain Updates) पडत आहे. हवामान विभागाने पालघरला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील शाळांना आज (गुरुवार) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे वाड्या वस्त्यांमध्ये (पाडा) काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे संसारपयाेगी वस्तुंच नुकसान झाले आहे. दरम्यान सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Palghar Rain News)

धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वसई विरारसह औद्योगिक वसहतीला पाणी पूरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी क्षमतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाचे जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण 79.98 टक्के भरलं आहे. या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत.

धामणी धरणातून 12 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. धामणी आणि कवडास धरण मिळून 48330 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आलाय. त्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज धरण क्षेत्रात 338 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 222.40 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Red Alert In Palghar)

घरांत पाणी शिरलं

पालघर मधील डेहणे- पळे ग्रामपंचायत हद्दीतील तळईपाडा, दांडेकर पाडा, लिंगा पाडा या गावांमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्यात एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू असून दुसऱ्या बाजूला आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे डेहणेपळे गावातील घरांमध्ये थेट पाणी शिरल आहे. त्यामुळे घरात असलेल्या साहित्याच नुकसान झालं असून नागरिकांची ही चांगलीच तारांबळ उडाली.

सर्व कामगार सुरक्षित

दरम्यान मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते आडकून पडले. हे सर्व कामगार गेल्या 15 तासांपासून अडकून पडले असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. (Palghar Rain Update)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT