Mumbai University  SaamTvNews
मुंबई/पुणे

MU Exam Postpone: हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा! मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पुढील ४८ तास महत्वाचे

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. ९ जुलै २०२४

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईमधील मुसळधार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले असून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून विश्रांती घेतली आहे. सखल भागात साचलेले पाणी ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्ग आणि रस्ते वाहतूक मार्ग देखील सुरळीत सुरू आहेत. हवामान खात्याकडून मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईतील सगळी यंत्रणेतील सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या!

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उद्या ( मंगळवार) दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT