Konkan Rain Update : कोकणासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी

Kokan Weather Update: कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन केले जात आहे.
Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी
Kokan Weather UpdateSaam TV

राज्यामध्ये सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अशामध्ये पुढचे दोन दिवस कोकणसाठी महत्वाचे असणार आहे. हवामान खात्याने कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन केले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ५०-६० किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी
Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

रत्नागिरी काहीशी उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासंत रत्नागिरी जिल्ह्यात १५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळं डोंगराळ भागातील धबधबे चांगलेच प्रवाहीत झाले आहेत. सध्या रत्नागिरीतील धबधबे आणि धरण क्षेत्र परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबई- गोवा महामार्गावरचा धबधबा पर्यटकांना खुणावतोय. महामार्गाला लागूनच राजापूरमध्ये हा धबधबा आहे.

Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी
Maharashtra Rain Update: राज्यात कोसळधार! कोकणाला पावसाने झोडपलं, नदी-नाल्यांना पूर; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. जल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीत मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पण जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री , मुचकुंदी नदी सध्या इशारा पातळीवर आहेत. तर खेडची जगबुडी नदी अद्यापही धोका पातळीवर आहे. तर सिंधुदुर्गमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे.

Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी
Buldhana Rain: बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप! नदीला पूर; आलिशान इनोव्हा कार वाहून गेली, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com