Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

Mumbai Rain Photos: मुंबईत काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढतच चालला आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
Mumbai Rain Alert
Mumbai Rain AlertSaam Tv
Published on
Mumbai Rain
Mumbai RainSaam Tv

राज्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाचा परिणाम संपूर्ण जनजीवनावर झाला आहे.

Mumbai Rain
Bhandup Railway StationSaam Tv

मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. भांडूप रेल्वे स्थानकावर सकाळी प्रचंड पाणी साचले होते.

Mumbai Rain
Andheri Sub WaySaam Tv

मुंबईत अंधेरी सबवे बंद ठेवण्यात आला आहे तर ठाण्यातदेखील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

Mumbai Rain
Thane rainSaam Tv

मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Mumbai Rain
Thane Railway Saam Tv

मुसळधार पावसामुळे शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain
Badlapur railway stationSaam Tv

बदलापूर, वांगणी, कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा बंद झाली होती. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची गर्दी झाली होती.

Mumbai Rain
Sub WaySaam Tv

सखल भागात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

Mumbai Rain
Mumbai RainSaam Tv

मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद या भागात झाली आहे.वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी), एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी),मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी), चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी), आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी) या भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com