Mumbai School Holiday Declared  Saam tv
मुंबई/पुणे

School Holiday: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Mumbai School Holiday Declared: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने याठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे याठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर, रायगडमध्ये रेड अलर्ट.

  • मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला.

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी.

  • प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. या सर्व ठिकाणांसाठी उद्याचा दिवस देखील महत्वाचा राहणार आहे. कारण हवामान खात्याने उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेला अलर्ट लक्षात घेता मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगडीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी असणार आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.'

मुंबईसोबत नवी मुंबईत देखील मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता नवी मुंबई आणि पनवेल क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ खासगी अनुदानित/ विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. तसंच नवी मुंबई महानगरपालिकेने आज सुद्धा पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर केली होती.

तर, ठाणे आणि रायगडमध्ये देखील पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच हवामान खात्याने दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. उद्या ठाणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT