Crime News: नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १० कोटींचं ‘मेफेड्रॉन’ जप्त

Mumbai Police Seizes 10 Crore Worth Drugs: मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड, जोगेश्वरी, दादर आणि नवी मुंबई येथे मोठ्या छाप्यांमध्ये १०.०७ कोटी रुपयांचे ४.०३४ किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. एका नायजेरियन नागरिकासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Police
Mumbai Police Seizes 10 Crore Worth Drugssaamtv
Published On
Summary
  • अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाचवेळी चार भागांमध्ये मोठी कारवाई केली.

  • एकूण ४.०३४ किलो मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त, किंमत ₹१०.०७ कोटी.

  • ५ आरोपी अटकेत; त्यातील एक नायजेरियन नागरिक.

  • घाटकोपर, बांद्रा आणि वरळी युनिटच्या पथकांनी स्वतंत्र छापे टाकले.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड, जोगेश्वरी, दादर आणि एमआयडीसी नवी मुंबई परिसरात मोठी कारवाई केलीय. एकाचवेळी केलेल्या चार वेगवेगळ्या कारवायांतून तब्बल ४.०३४ किलो ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केलाय. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे १०.०७ कोटी रुपये आहे. याप्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आलीय. अटक आरोपींपैकी एक नायजेरियन नागरिक आहे.

२८ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर, बांद्रा आणि वरळी युनिटच्या पथकांनी स्वतंत्र छापे टाकले. यात जोगेश्वरी पश्चिम, मालाड पूर्व व दादर पश्चिम परिसरातून एम.डी. अंमली पदार्थ जप्त झाला. तर एमआयडीसी, नवी मुंबईतून पाहिजे असलेल्या नायजेरियन आरोपीकडूनही मोठ्या प्रमाणात एम.डी. हस्तगत करण्यात आला.

Mumbai Police
Shocking News : आईशी सतत भांडतो, संतापलेल्या तरुणाने धाकट्या भावाला संपवलं; भंडाऱ्यात खळबळ

मुंबई पोलिसांकडून ड्रॅग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त

काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी ड्रग्स प्रकरणाचा तपास करताना ड्रग्सचा फॅक्टरी उद्धवस्त केलीय. मुंबई पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन MD ड्रॅग्स बनवणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई केली होती.पोलिसांनी ४०० कोटींचा ड्रग्स जप्त केला होता. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १८८ किलो MD ड्रग जप्त करण्यात आले आहे.

Mumbai Police
Wardha Crime : मुंबईहुन एमडी ड्रग्स पुरवठा; तस्करीसाठी दोन महिन्याच्या बालकाचा वापर, वर्ध्यात मोठी कारवाई

अटक करण्यात आलेले आरोपी कर्नाटकमधून हे सर्व आरोपी मुंबई शहरात MD ड्रग्सचा पुरवठा करत होते. आत्तापर्यंत एकूण ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ड्रग्सप्रकरणी साकीनाक पोलीस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासदरम्यान पोलिसांना म्हैसूरमधील ड्रग्स फॅक्टरीचा तपास लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com