heat wave effect vegetables rates doubled in mumbai pune  Saam Tv
मुंबई/पुणे

Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

vegetables price hike : उष्ण वातावरण आणि पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस हे दर चढेच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे / सागर आव्हाड

राज्यातील तापमान वाढीचा फटका शेतीला लागला आहे. परिणामी राज्यातील बहुतांश भागातून येणा-या भाजीपाल्याची आवक घटू लागली आहे. त्यामुळे घाऊकसह किरकाेळ बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आहे. मुंबईसह पुण्यात आगामी 3 महिने भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतील असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पुण्यात पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

उष्णतेचा फटका शेतीमालाला बसल्याने पालेभाज्या व फळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. पुढील तीन महिने भाव वाढण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. पुण्यातील बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला किंमत ही ५० ते ६० रुपये झाली. पाालेभाज्यांचे आवक कमी प्रमाणावर झाल्याने महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोथिंबीर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रावणी घेवडा तीनशे रुपये पाेहचला आहे. टोमॅटोही पन्नास रुपयांपर्यंत गेला आहे. हीच परिस्थिती राहिली तर टोमॅटोचे भाव हे शंभर रुपयापर्यंत जातील.

एपीएमसीत भाज्यांचे दर वधारले

एपीएमसी भाजीपाला बाजारात आवक घटल्याने काही भाज्यांचे दर वधारलेत. एपीएमसी भाजीपाला बाजारात आवक केवळ 478 गाड्यांची झाल्याने याचा परिणाम काही भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. फरसबी, शेवगा शेंग, फ्लोवर आणि ढोबळी मिरचीचे दर वधारलेत तर कोथिंबीरचे दर दुपटीने वाढलेत.

मागील आठवड्यातील दर

फरसबी 70

घेवडा 40

काकडी 26

शेवगा शेंग 37

वाटाणा 80

फ्लॉवर 20

गाजर 45

ढोबळी मिरची 35

भेंडी 40

चवळी शेंग 35

सुरण 75

पालेभाजी

कोथिंबीर 30

मेथी 20

पालक 20

कांदापात 15

मुळा 50

आजचे दर

फरसबी 90

घेवडा 37

काकडी 22

शेवगा शेंग 45

वाटाणा 80

फ्लॉवर 24

गाजर 21

ढोबळी मिरची 37

भेंडी 40

चवळी शेंग 35

सुरण 60

पालेभाजी

कोथिंबीर 60

मेथी 22

पालक 15

कांदापात 12

मुळा 40

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Peacock's biggest sorrow: मोराचं सर्वात मोठं दुःख माहितीये का? वाचून तुम्हालाही वाईट वाटेल

PM Kisan Yojana : धक्कादायक! किसान सन्मान योजनेतून राज्यातील २५०००० शेतकरी वगळले

Mumbai : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आंध्र प्रदेशमधून आला फोन

Akon Video: धक्कादायक! भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाची टवाळखोरानी काढली पॅन्ट, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT