Baramati Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

Baramati Police: बारामतीमध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. तिघांच्या जाण्याने धक्का बसलेल्या आजोबांनीही प्राण सोडले. २४ तासांत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • बारामतीमध्ये ट्रक- दुचाकी अपघातात वडील आणि दोन मुलींचा मृत्यू

  • अपघाताच्या धक्क्याने आजोबांचा २४ तासांत मृत्यू

  • एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यूमुळे बारामतीमध्ये शोककळा

  • पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून तपास सुरू

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमध्ये ट्रक आणि दुचाकीमध्ये भयंकर अपघात झाला होता. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकलींना ट्रकने चिरडले. त्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये सोन्यासारखा मुलगा आणि २ नाती गमावल्यामुळे बसलेला धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत घरातील चौथा व्यक्ती गेल्यामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बारामतीमध्ये रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये ओंकार आचार्य आणि त्यांच्या मुली सई (११ वर्षे) आणि मधुरा (५ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे आधीच आचार्य कुटुंब दु:खात होते. अशामध्ये त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचे २४ तासांत निधन झाले. त्यामुळे आचार्य कुटुंबाला मोठा धक्का बसला.

ओंकार आचार्य आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. या घटनेचा धक्का सहन न झाल्यामुळे राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज पहाटे निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. अपघातामध्ये आपला सोन्यासारखा मुलगा आणि नाती गेल्यामुळे श्रीनिवास हे सतत रडत होते. त्यांच्या जाण्याच्या दु:खात श्रीनिवास यांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीमध्ये शोककळा परसरली आहे.

दरम्यान, ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी १२ वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते. ते खंडोबानगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांच्याही अंगावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातामध्ये ओंकार यांनी जागीच प्राण सोडले. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषीत केले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT