Pune Accident : रिक्षाची वृद्धाला धडक, चालकाने मदतीचे सोंग केलं अन् जखमीला निर्जन ठिकाणी सोडलं; उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू

Pune Accident News : पुण्यातील बालेवाडी फाट्याजवळ एका रिक्षाने वृद्ध व्यक्तीला धडक मारली. रिक्षाचालकाने जखमी वृद्धाला मदतीचे नाटक केले आणि एका निर्जन ठिकाणी सोडले. उपचार न झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाला.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam Tv
Published On

Pune : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील बालेवाडी फाट्याजवळ एटीएसमधून पैसे काढल्यानंतक एका ६३ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाला ऑटोरिक्षाने जोरात धडक मारली. ऑटोरिक्षा चालकाने मदत करण्याचे नाटक करत वृद्ध व्यक्तीला एका निर्जन परिसरात सोडून दिले. जखमी असताना उपचार न झाल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी ऑटोरिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्युपिटर हॉस्पिटलपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर अपघात झाला. ६३ वर्षीय गोपाळ वाघ यांना रिक्षाने धडक मारली. आसपासच्या लोकांना घाबरुन रिक्षाचालकाने गोपाळ यांना रिक्षात बसून रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. पण त्याने गोपाळ यांना रेंज हिल्सजवळच्या एका निर्जन परिसरात सोडून दिले. वाघ यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल २४ तासांनंतर गोपाळ वाघ यांना मृतदेह सापडला.

Pune Accident News
Sangli : हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, जलजीवन मिशनच्या मुख्य ठेकेदाराने सांगितली धक्कादायक माहिती

दोन तासांहून अधिक काळ ते (गोपाळ वाघ) घरी परतले नाही, तेव्हा आम्हाला काळजी वाटली. एटीएमजवळ त्याची दुचाकी पार्क असल्याचे पाहिले. मला रस्त्यावर त्यांची चप्पल दिसली. इथे अपघात झाल्याचे मला स्थानिकांनी सांगितले, असे गोपाळ वाघ यांचा मुलगा अमित वाघ यांनी सांगितले. त्यानंतर वाघ कुटुंबाने बाणेर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

Pune Accident News
Kalyan : कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाचा नवा व्हिडीओ समोर, थेट पत्रकारांनाच धमकावलं; पाहा Video

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा बालेवाडीहून विद्यापीठ चौकाकडे जात असताना वाघ रस्ता ओलांडताना हा अपघात घटला. घटनास्थळी गर्दी जमली आणि लोकांनी चालकाला जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात सांगितले. चालकाने होकार दिला पण जखमीला त्याने रेंज हिल्सकडे एका निर्जन ठिकाणी सोडले. त्यासाठी जखमीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे. जखमी व्यक्तीला सोडून देण्याच्या रिक्षाचालकाच्या निर्णयामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Pune Accident News
Crime : वाद झाला अन् बॉयफ्रेंडची सटकली, गर्लफ्रेंडला घाटावरुन ढकललं; संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com