Sangli : हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, जलजीवन मिशनच्या मुख्य ठेकेदाराने सांगितली धक्कादायक माहिती

Sangli News : जल जीवन मिशन योजनेपैकी हर्षल पाटील यांनी केलेल्या कामांचे पैसे राज्य सरकारकडे थकीत असल्याचा खुलासा योजनेतील मुख्य ठेकेदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Sangli News
Sangli NewsSaam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतात गळफात घेत आत्महत्या केली. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करुनही हर्षल पाटीलला कामाचे पैसे मिळाले नव्हते. तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे थकीत बिल आणि वाढत्या कर्जामुळे हर्षलने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. काम पूर्ण झाले असतानाही सरकारने वर्षभरापासून बिल न दिल्याने हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हात झटकले आहेत. कंत्राटदारांचे पैसे थकले नसल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. पण या दाव्यावप संघटनेच्या मुख्य ठेकेदाराने मोठा खुलासा केला आहे.

Sangli News
Kalyan : कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाचा नवा व्हिडीओ समोर, थेट पत्रकारांनाच धमकावलं; पाहा Video

हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य ठेकेदार चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची थकीत रक्कम राज्य सरकारकडे आहे. हर्षल यांनी केलेल्या कामांचे पैसे थकीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Sangli News
Pune Metro : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो लाईन ३ सुरु होणार; कामाची मोठी अपडेट समोर

हर्षल पाटील यांना तांदूळवाडी आणि मालेवाडी या दोन गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आले होते. त्यापैकी तांदूळवाडीचे काम पूर्ण होऊन हर्षलला या कामासाठी १ कोटी ९८ लाख रुपयांची देयक दिली आहे, उर्वरित ६४ लाखांची देयक थकीत आहेत. मालेवाडीच्या कामांपैकी १ कोटी ५७ लाख रुपये अदा केली होती. ज्यामध्ये ६२ लाखांची रक्कम शासनाकडे थकीत आहे, अशी माहिती जल जीवन मिशन योजनेतील मुख्य ठेकेदार चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.

Sangli News
Kalyan News : मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळचा मुक्काम तुरुंगातच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com