
धुळे-सोलापूर महामार्गावर कारला भीषण अपघात
कार दुभाजकाला धडकून २०० मीटर लांब उडाली
कार अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे
या कार अपघातामध्ये दोघे जण जखमी झालेत
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण कार अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातग्रस्त कार दुभाजकाला धडकून चेंडूसारखी उडाली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. कारमध्ये असलेले दोघे जण या अपघातामध्ये बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारात अपघताची ही घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून फिल्म स्टाईलने उडाली. तब्बल २०० मीटर लांब चेंडू सारखी उडून ही कार पडली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. अपघातामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. कारमध्ये असणारे दोघेही सुखरूप आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर फेल झालेल्या कंटेनरने २५ वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले. एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर खोपोली एक्झिट येथील बोगद्या जवळ ही घटना घडली. ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनरने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत २५ वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. उतारावर अचानक या कंटेनरचा ब्रेक फेल झाला त्यानंतर त्याने सर्व वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेच नाव अनिता महादेवराव येकंडे असे होते. या अपघााचा तपास पोलिस करत आहेत.
तर, शनिवारी चिखलदरा पर्यटन स्थळावर देखील मोठा अपघात झाला. कार ६०० फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळलेल्या कारमध्ये सहा प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुदैवाने वाचले. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ही कार दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच डी डी आर एफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले त्यांचे प्राण वाचवले. खोल दरीत पडलेल्या पर्यटकांना दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संभाजीनगरमध्ये कार अपघाताची घटना कुठे घडली?
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारामध्ये कारला अपघात झाला.
कारला अपघात कशामुळे झाला?
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला.
कार अपघातामध्ये जीवितहानी झाली का?
सुदैवाने या कार अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. दोघे जण जखमी झालेत.
कार अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे का?
या कार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.