Pune Daund Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : रोड रोलर खाली येऊन ४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यात अपघाताचा थरार

Pune Daund Accident News : पुण्यातील दौंड येथे डांबरीकरणाच्या कामात सुरक्षात्मक उपाय न केल्यामुळे रोलरखाली येऊन ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

Alisha Khedekar

  • दौंडमध्ये डांबरीकरणाच्या कामादरम्यान ४ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • सुरक्षात्मक उपाय न करता रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवला

  • रोलर चालक अपघातानंतर फरार

  • कामगारांच्या व मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील दौंडमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ४ वर्षीय मुलाचा रोलर खाली येऊन मृत्यू झाला आहे. मृत मुलगा हा मजूर म्हणून काम करणाऱ्या एका कामगार महिलेचा असल्याचं उघड झालं आहे. सदर घटना शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आर्यन जाधव असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरु होते. या रस्त्याच्या कामासाठी काही कामगार काम करत होते. या कामगारांमध्ये एक महिला आपल्या ४ वर्षीय मुलाला घेऊन काम करत होती. यादरम्यान लवकर काम उरकण्याच्या नादात रोड रोलर चालकाने रोलर फिरवण्याचा वेग वाढवला.

या रोलर खाली सापडून आर्यन जाधव याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर रोड रोलर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतुकीसाठी रस्ता बंद न करता डांबरीकरण सुरू होते. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण करत असताना सुरक्षात्मक उपाय केले नसल्याचे समोर आले.

आर्यनच्या मृत्यूनंतर विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांचे सुपरवायझर कामाच्या ठिकाणी फिरकले सुध्दा नसल्याचा आरोप मृत मुलाच्या पालकांनी केला आहे. प्रशासकीय अनस्तेमुळे मजुरी करणाऱ्या एका गरीब जोडप्याला आपले बाळ गमवावे लागले असून कामगार पती पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! २ मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी, सुरू कधी होणार? सरकारने थेट आदेश काढला

Bigg Boss फेम अभिनेत्याने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

Kharat Case : रूपाली चाकणकरांची आज होणार चौकशी? लेटेस्ट अपडेट समोर

SCROLL FOR NEXT