mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

दोघांचे भांडण सोडवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावातला प्रकार

अजय दुधाणे

अंबरनाथ - गावातल्या दोन जणांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या इसमाला जीव गमवावा लागल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावात घडलीये. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात आंभे गाव आहे. या गावात राहणाऱ्या अभिमन्यू भाग्यवंत आणि गंगाराम भाग्यवंत या दोघांमध्ये २० मे रोजी सकाळी भांडण सुरू होतं. हे भांडण सोडवण्यासाठी काथोड भाग्यवंत हे मध्ये पडले.

हे देखील पाहा -

मात्र काथोड आणि अभिमन्यू यांचे आधी एकदा किरकोळ वाद झाले असल्यानं अभिमन्यू याला त्यांचा राग आला आणि त्यानं लाकडी दांडक्यानं काथोड भाग्यवंत यांच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काथोड यांना आधी उल्हासनगरच्या शासकीय माध्यवरी रुग्णालयात, तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी २७ मे रोजी काथोड भाग्यवंत यांचा मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. मलंगगड परिसरात सातत्यानं गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं या भागात एखाद्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची गरज यानंतर व्यक्त होते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT