...तर उद्धव ठाकरेंनी तो शब्द पाळायला हवा होता : रामदास आठवले

संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Saam Tv

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी दिलेला शब्द मोडल्याचा संभाजीराजे यांच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहिती नाही.शब्द जर दिला असेल तर उद्धव ठाकरे यांनी तो पाळायलायला हवा होता, अशा शब्दात रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संभाजीराजे (SambhajiRaje ) यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Athawale Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज पवई मध्ये पार पडला. हा मेळावा संपन्न झाल्यावर आठवलेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपावर भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'संभाजीराजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहिती नाही. शब्द उद्धव ठाकरे यांनी जर दिला असेल तर त्यांनी पाळायला हवा होता. परंतु संभाजीराजेंनी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला सोडायचा विचार करणं अत्यंत अयोग्य होतं. त्यांनी भाजपसोबत राहायला पाहिजे होतं. त्यात शिवसेनेनं त्यांना शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणं आहे, दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं याची आम्हाला कल्पना नाही. मात्र, संभाजीराजेंनी भाजपपासून दूर जायला नको होतं.'

Ramdas Athawale
राणे कुटुंबीयांनी कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली : विनायक राऊत

दरम्यान, आठवले यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील त्यांच्या पक्षाची रणनीती सांगितली. आठवले म्हणाले, 'रिपब्लिकन पक्षाला मुंबईमध्ये निवडणुकीला पंधरा ते वीस नगरसेवक मिळतील अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आमची रणनीती आहे. गेल्यावेळी भाजप आणि आरपीआय पक्षाचे मिळून ८२ नगरसेवक आले होते. आता जवळजवळ ११५ नगरसेवक निवडून आणण्याच प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. रिपब्लिकन पक्षाला ३० ते ३२ जागा मिळाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. ईशान्य आणि दक्षिण मुंबईमध्ये दलितांची संख्या जास्त आहे. त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. त्यामुळे ३५, ३६ जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे'.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com