Crime News, Purandar, Jejuri Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Mother's Day दिवशी हाेणार गर्भपात, गाेपनीय Mail आला पण त्यापुर्वीच..., डाॅक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल

गाेपनीय मेल आला आणि यंत्रणा कामाला लागली.

मंगेश कचरे

Purandar Crime News : देशात रविवारी मदर्स डे (mothers day) साजरा हाेत असतानाच महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यात सोन्याच्या नीरा गावात गर्भपात केला जात असल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणी डॉक्टर सचिन रामचंद्र रणवरे (dr sachin ramchandra ranaware) याच्यासह गर्भिणी दिपाली थोपटे (deepali thopte) आणि बरकडे नावाचा एजंट या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदर्स डेच्या दिवशी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ संग्रामआप्पा यम्पल्ले यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडून गोपनीय मेल आला होता. हा मेल 12 मे रोजी आला होता.

त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी या गावांमध्ये बरकडे नावाचा एजंट असून तो निरा गावातील डॉक्टर सचिन रणवरे यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर रित्या गर्भपात करत असल्याची माहिती दिली समोर आली आहे.

दरम्यान 14 मे रोजी डॉक्टर सचिन रणवरे हा डॉक्टर दिपाली थोपटे नावाच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या मेलवर आली होती. या महिलेला पहिली मुलगी असून बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉ. रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती.

हा सगळा प्रकार कळल्यानंतर डॉक्टर यम्पल्ले हे विधी सल्लागार वकील मेघा सतीश सोनतळे यांच्यासह श्रीराम हॉस्पिटलमध्ये रविवारी पोहोचले. या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सचिन रणवरे यांचे वडील राम रणवरेदेखील होते. त्यांना डॉ. यम्पल्ले यांनी आपली ओळख सांगितली आणि त्यानंतर दवाखान्याची तपासणी केली.

फोन केला अन् सत्य उघड झालं...

दवाखान्याच्या गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली. मात्र त्यावेळी रजिस्टरमध्ये दिपाली थोपटे हे नाव नव्हते. त्यानंतर दिपाली यांना फोन केला असता त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी संध्याकाळीच गर्भपात केला असल्याची माहिती दिली.

हा गर्भपात डॉ. सचिन रणवरे याने केला असून त्यासाठी बरकडे नावाच्या एजंटने गर्भलिंगनिदान केले असल्याची माहिती देखील मिळाली. त्यानंतर डॉक्टर यम्पल्ले यांनी पुन्हा डॉक्टर सचिन रणवरे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा सचिन रणवरे यांनी दिपाली थोपटे यांचे अर्धवट भरलेले अर्ज आणि इतर माहिती डॉक्टर यम्पल्ले यांच्याकडे दिली. त्यातून या ठिकाणी बेकायदेशी रित्या गर्भपात झाल्याचं निष्पन्न झालं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT