grandmother passes ssc exam with grandson x
मुंबई/पुणे

विषयच हार्ड...! ६५ व्या वर्षी बोर्डाची परीक्षा दिली, नातवासह आजी दहावी पास झाली, किती गुण मिळाले?

Mumbai News : मुंबईतील एक महिला वयाच्या ६५ व्या वर्षी दहावीच्या बोर्डात उत्तीर्ण झाली आहे. तिने नातवासह दहावीची परीक्षा दिली होती. दोघेही चांगल्या गुणांनी बोर्डाच्या परीक्षेत पास झाले आहेत.

Yash Shirke

संपूर्ण राज्यभरात काल (१३ मे) दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला. राज्यात यंदाच्या वर्षी ९४.१० टक्के विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुली वरचढ ठरल्या. काही विद्यार्थ्यांनी ९९ हून अधिक टक्के मिळवले. तर काहीजण सर्व विषयांत ३५ गुण मिळवत ३५ टक्क्यांनी पास झाले. अशातच मुंबईतून एका कुटुंबातील आजी आणि नातू सोबत दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

६५ वर्षीय प्रभादेवी यांनी नातवासह दहावीची, बोर्डाची परीक्षा दिली. त्या ५२ टक्के मिळवून दहावी पास झाल्या आहेत. तर त्यांच्या नातवाला, सोहमला ८२ टक्के मिळाले आहेत. आजी आणि नातवाच्या यशामुळे कुटुंबामध्ये डबल आनंद पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या या आजी-नातवाच्या जोडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय प्रभादेवी यांनी दहावीत ५२ टक्के मिळवले, तर त्यांचा नातू सोहम जाधवने ८२ टक्के मिळवले आहेत. 'दहावी बोर्डाच्या परीक्षेत पास झाल्यानंतर मला आनंद झाला. मी आणि माझा नातू एकाच वेळी पास झालो यामुळे मी खूश आहे. माझा नातू इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झाला, आणि मी मराठी माध्यमातून... मी जेव्हा परीक्षेला जायचे तेव्हा सगळेजण आनंदी असायचे', असे प्रभावती म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला. या वर्षी महाराष्ट्रात दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला. कोकण विभागाचा पुन्हा बाजी मारली. नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. कोकण विभागाचा ९८.८२ टक्के, तर नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

SCROLL FOR NEXT