Bhagat Singh Koshyari Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Bhagat Singh Koshyari News: हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यपालांची उंचलबांगडी होणार?

Bhagat Singh Koshyari Latest News: राष्ट्रपतींना पाठवलेलं पत्र केंद्रीय गृहविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलं गेलं आहे अशी माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Bhagat Singh Koshyari Latest News: १९ डिसेंबर पासून महाराष्ट्र विधीमंडळाचं नागपूर इथं हिवाळी अधिवेशन होत आहे. त्याअगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण राज्य विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजू शकतो. विरोधक सत्ताधारांची राज्यपालांच्या मुद्द्यावरून चांगलीच कोंडी करू शकतात. त्यामुळे राज्यपालांची हिवाळी अधिवेशानाअगोदर हकालपट्टी होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. (Maharashtra Politics)

राज्यपालांची (Bhagat Singh Koshyari) पदावरून हकालपट्टी करण्यासंदर्भात उदयनराजे यांनी २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांनी दखल घेतल्याची माहिती उदयनराजेंनी दिली आहे. राष्ट्रपतींना पाठवलेलं पत्र केंद्रीय गृहविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलं गेलं आहे अशी माहिती उदयनराजे यांनी दिली आहे. त्यामुळं राष्ट्रपती उदयनराजे यांच्याविरोधात कारवाई करणार का? जर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खरंच कारवाई केली जाणार असेल तर ती विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर केली जाणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

राज्यपालांना कोण हटवू शकतं?/ राज्यपालांना हटविण्याचे अधिकार कोणाला असतात?

राज्यपालांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताचे राष्ट्रपती यांना असतात. तसंच त्यांना हटवण्याबाबतचा निर्णय सुद्धा केवळ राष्ट्रपतींच्या हातात असतो. आपल्या देशात राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतात. त्यामुळं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यपाल पदावरील व्यक्तीला पुन्हा बोलावू शकतात. (LIVE Marathi News)

राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात जाता येत नाही…

राज्यपालांना हटवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणालाही कोर्टातही दाद मागता येत नाही. कारण निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करत असतात. त्यामुळं राज्यपालाच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार अर्ज दाखल करू शकतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT