Swasthyam 2022 News:
शरीरासोबत मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी मनाची शांती महत्वाची आहे. मनाची शांतता मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. यात सर्वात महत्वाचा उपाय ध्यान-धारणा होय. ध्यान-धारणा (Meditation) हा मार्ग मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मन स्थिर करण्यासाठी चांगला मार्ग आहे. ‘स्वास्थ्यम्’ या सकाळ माध्यम समूहाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. (Latest Marathi News)
मानसिक आरोग्यासाठी ध्यान-धारणा
आपले अस्थिर व चंचल मन एका जागी स्थिर करणे, एका बैठकीतच एकाग्रतेने एकच काम पूर्ण करणे किंवा एकाच वेळी अनेक कामे करणे या दोन्ही गोष्टी शिकता येतात. कालानुरूप व परिस्थितीनुसार त्यात बदल करता येतो. हा बदल कसा करायचा हे शिकण्यासाठी आपली 'ध्यानाशी' किमान तोंडओळख असणे फायदेशीर ठरेल. 'ध्यान' या शब्दाचा इथे अर्थ आपण ‘लक्ष’ अशा अर्थी घेऊ...
रोज प्रत्येक क्षणी आपण जे काही करतो आहोत ते ‘लक्षपूर्वक करणे म्हणजे ध्यान’. ‘माईंड फुलनेस’ हा ध्यानाचा इंग्रजी अनुवाद, त्याअर्थी ध्यान म्हणजे ‘बिईंग माईंडफुल’. ध्यान-धारणेची सवय मनाला लावता आल्यास दैनंदिन आयुष्यातले असंख्य ताण-तणाव आपल्याला स्वतःपासून लांब ठेवता येतात. (LIVE Marathi News)
हे साध्य कसे करायचे, तर आपण ज्या-ज्या कृती दिवसभरात करतो, त्या पूर्ण लक्ष देऊन करायची सवय काही दिवस स्वतःला लावायची. सुरुवात दिवसाला एक किंवा दोन कृतींपासून केल्यास सरावाने आपल्याला सगळ्याच कृती लक्षपूर्वक करणे अंगवळणी पडू शकते.
झाडांना पाणी देताना प्रत्येक पाना-फुलाचं निरीक्षण करणे, सकाळी फिरायला जाताना हेडफोन न लावता आजूबाजूचे आवाज घेणे, पोळ्या करताना व भाजी चिरताना अधिक लक्षपूर्वक करणे, वाहन चालवताना हेडफोन न लावता आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग असणे, ऑफिसमध्ये काम करताना आजूबाजूच्या सहकाऱ्यांच्या ताणाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करणे यांसारखे छोटे-छोटे प्रयोग आपल्याला सजगतेने जगायला शिकवू शकतात. (Tajya Batmya)
अगदी सोप्या शब्दात सांगायचे, तर आपली पाचही ज्ञानेंद्रिये आणि त्यातून होणाऱ्या आकलनाकडे, जसे ऐकणे, चव घेणे, वास घेणे, स्पर्श समजून घेणे आणि लक्षपूर्वक बघणे या कृती आपल्याला सजगता शिकवतात, त्यांची मदत 'एकाग्रता' विकसित करण्यासाठी होते.
अशाप्रकारची पाच मिनिटांपेक्षा कमी कालावधीची सजगता जमू लागल्यास आपले ताण-तणाव विसरून आपण निसर्गाशी एकरूप होणे, स्वयंपाक घरातले कापणे-भाजणे यांसारखे छोटे-छोटे अपघात टाळणे, सहकाऱ्यांना समजून घेतल्याने त्यांच्याशी संवाद साधणे सोपे जाणे, लक्षपूर्वक वाहन चालवल्याने रस्त्यातील अपघात टाळणे अथवा आपल्या आसपास काही अपघात झालाच तर त्याला त्वरित मदत करता येणे यांसारखे रोजच्या जगण्यातले ताण-तणाव नक्कीच टाळता येतील. (Breaking Marathi News)
हे झाले थेट फायदे, पण सजगतेने व एकाग्रतेने काम करण्याचे अनेक अप्रत्यक्ष फायदेही आहेत, जसे विचार, भावना, वर्तनाची तीव्रता कमी करणे, सतत प्रतिक्रिया देण्याची सवय कमी करणे, परस्पर नातेसंबंध सुधारणे, आपले शारीरिक आरोग्य जपणे जे अनेक मानसिक रोगाचे मूळ आहे. लक्षपूर्वक जीवन जगण्याची सवय लागल्यास ‘प्रतिक्रिया’ देणे, ‘विचार ना करता बोलणे’ आणि त्यामुळे परस्पर संबंधांवर गदा येणेही टाळता येऊ शकते.
ध्यान-धारणेने आपले आपल्याशी असलेले नाते सुधारते. सतत इतरांच्या पावतीची गरज आपल्याला भासत असेल, तर याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, आपले आपल्यावरच प्रेम नाही, विश्वास नाही, स्वत:लाच स्वतःची खात्री नाही. असे अविवेकी विचार, भावना, वर्तन टाळायचे असतील तर आपल्याला हळूहळू ‘माझं मी बरोबरचे’ अंतर कमी करायला हवे, त्यासाठी ध्यान-धारणेची मदत नक्कीच होऊ शकते.
३ दिवस तज्ज्ञांचं मार्गदर्शन
- डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे
- ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : कला आणि संस्कृतीच्या भारतीय प्रेरणा
- अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला
- योग गुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग
- नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य
- प्रियंका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा
- अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल- योगा आणि फिटनेस
- सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे
- अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य
- सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन
- डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन
- ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख: लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन
‘स्वास्थ्यम्’मध्ये सहभागी व्हा! त्यासाठी काय कराल?
‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून रजिस्र्टेशन करू शकता.
Website: https://globalswasthyam.com
- व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी /व्यवसाय व संपर्क क्रमांक
- संस्था व ग्रुपच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुपचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक
उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !
Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam
Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/
Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam
LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.