Navi Mumbai Airport Bus Services Saam Tv
मुंबई/पुणे

Good News: नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुण्याला जा, ई-बस सेवा होणार सुरू; तिकीटासाठी किती मोजावे लागणार?

Navi Mumbai Airport Bus Services: नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुणे, दादर आणि बोरिवली असा प्रवास करता येणार आहे. या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार ते घ्या जाणून...

Priya More
  • नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुण्याला जाता येणार

  • नवी मुंबई एअरपोर्ट ते पुणे ई-शिवाई बस सेवा होणार सुरू

  • ७ ऑक्टोबरपासून एमएसआरटीसीची ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सेवा सुरू करणार

  • नवी मुंबई एअरपोर्टवरून दादर आणि बोरिवलीला देखील बस सुटणार

नवी मुंबई एअरपोर्टवरून प्रवास करणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नवी मुंबई एअरपोर्टवरून लवकरच ई-बस सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या भागात आणि पुण्याला जाणं अधिक सोपं आणि आरामदायी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा खर्च देखील वाचणार आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून एमएसआरटीसीच्या ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सेवा नवी मुंबई एअरपोर्टवरून सुरू होणार आहे. यासोबत प्रवाशांना मोफत शटल आणि खासगी बसेसमधून प्रवास करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ म्हणजे एमएसआरटीसीची ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सेवा ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या बसमुळे मुंबई आणि पुण्यातील नागरिकांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. या ई-बसमधून प्रवाशांना दादर पश्चिम, बोरिवली आणि पुण्याला जाता येईल. त्यामुळे प्रवाशांना कॅबसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

या बसमधून प्रवास करताना किती खर्च करावा लागेल याची माहिती देखील समोर आली आहे. एअरपोर्टवरून दादरला जाण्यासाठी प्रवाशांना तिकीटासाठी १७० रुपये द्यावे लागतील. तर बोरिवलीसाठी २१० रुपये आणि पुण्यासाठी ४५० रुपये तिकीटासाठी खर्च करावा लागतील. महत्वाचे म्हणजे, नवी मुंबई एअरपोर्टवरून दादरला जाणारी ई-बस सायन आणि अटल सेतू मार्गे जाणार आहे. त्याचसोबत बोरिवलीला जाणारी बससुद्धा अटल सेतूवरूनच जाईल.

या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना तिकीटाच्या दरात सवलत देखील मिळणार आहे. १२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटांच्या दरात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. या विशेष बससेवेमुळे प्रवाशांना वेळेत आणि कमी खर्चात एअरपोर्टवर पोहचणं सोपं होईल. ठाणे आणि नाशिककरांसाठी देखील ई-बससेवा सुरू करण्याचा सरकारचा प्लान आहे. ही बससेवा नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nath Designs : नवरात्रीत नथीचा नखरा! पाहा गरबा नाईटसाठी ७ ट्रेंडिंग नथीचे डिझाइन्स, लूक दिसेल एकदम हटके

Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

Health Tips : उशिरा उठता आणि व्यायामही करत नाही? शरीरात होऊ शकतात 'हे' गंभीर बदल, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीतील वातावरण तापले! राहुल गांधींचा गनिमी कावा, आयोगात जाण्यासाठी लढवली शक्कल, थेट आकाशवानी भवनात पोहोचले अन्...

SCROLL FOR NEXT