

देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील विमानांचे स्थलांतर न करण्याबाबतचा निर्णय
अदानी एअरपोर्ट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये विमानांवरून वाद
मुंबई विमानतळाच्या टी-१ टर्मिनलचे काम पूर्ण होईपर्यंत उड्डाणे हलवणार का?
मुंबई विमानतळावरून उड्डाणे नवी मुंबईला नेण्यावरून अदानी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतली उड्डाणे नवी मुंबईला नेण्यासाठी कोणतीही पूर्व चर्चा न झाल्यामुळे सरकारने नाराजी व्यक्त केलीय.
अदानी एअरपोर्ट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. मुंबई विमानतळावरील विमाने वळवण्यात येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतरही विमाने नवी मुंबई विमानतळावर वळवण्यात आले. यावरून सरकार आणि नवी मुंबई विमानतळ संचालक मंडाळ आमनेसामने आलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून नवी मुंबई विमानतळावर मुंबईतील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण हलवू नये, अशी भूमिका मांडली होती. मुंबई विमानतळावरील टी-1 टर्मिनलचं काम पूर्ण होईपर्यंत विमानांचं स्थलांतर करू नये, अशी सरकारनं भूमिका मांडली होती. दरवर्षी सुमारे 50 लाख देशांतर्गत प्रवाशांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. विमान कंपन्यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली होती. परंतु विमानांचे उड्डाण तिकडे करण्यात आल्यामुळे सरकार आता कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
अदानी समूहाच्या अखत्यारीतील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने उन्हाळी हंगाम २०२७ साठी काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला या कंपन्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांच्या वेळा रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रमुख आखाती विमान कंपन्यांनी भारत व त्यांच्या देशांत राजनैतिक पातळीवर हा मुद्दा नेण्याचा गंभीर इशारा दिलाय.
मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ च्या पुनर्विकासासाठी विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ५० लाखांनी कमी करणं आवश्यक आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने मार्च २०२७ पासून १४ आंतरराष्ट्रीय ठिकाणांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव मांडला. या योजनेचा भाग म्हणून, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वरील आखाती विमान कंपन्यांचे हक्काचे वेळापत्रक नाकारण्यात आले.
या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या १२ परदेशी विमान कंपन्यांमध्ये प्रामुख्याने आखाती देशांच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी याला विरोध दर्शवलाय. यात त्यात कतार एअरवेज, सौदिया, एअर अरेबिया, ओमान एअर, गल्फ एअर, कुवेत एअरवेज, रियाध एअर, फ्लायनास, फ्लायडील, जझीरा एअरवेज व सलाम एअर यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.