कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यशस्वी करून दाखवलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाचं लोण आता इतर जिल्ह्यातपर्यंत पोहचलयं...सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकमध्येही ऊस दर वाढीसाठी आंदोलनं पेटलंय.. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे वाढीव ऊस दर परवडत नसल्याचा दावा इतर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी केलाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी कोल्हापूर पॅटर्नच्या धर्तीवर इतर जिल्ह्यातही ऊसाला 4 हजार दर देण्याची मागणी केलीय...
दरम्यान राज्यभरातील ऊस आंदोलनाची सद्यस्थिती काय आहे? पाहूयात...
साताऱ्यात शिवनेरी शुगर्सकडून 3800 रुपयांची पहिली उचल जाहीर झाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाला 5 दिवस स्थगित दिलीय..
सोलापूरात 19 नोव्हेंबरच्या बैठकीपर्यंत गाळप बंद ठेवण्याचे आदेश दिले असून शेतकरी 3500 रुपये उचलीवर ठाम
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्येही
शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत 3900 रुपये पहिली उचल आणि एकूण 4200 रुपये ऊस दराची आक्रमक मागणी केलीय..
अहिल्यानगर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी पहिली उचल 3100–3200 रुपयापर्यंत जाहीर केलीय, मात्र शेतकरी 4200 दरासाठी आक्रमक
दरम्यान सोलापूरात स्वाभिमानी संघटनेनं ऊस दरवाढीच्या आंदोलनाला स्थगिती दिली असली तरी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे ऊसाला दर मिळाला नाही, तर रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग रोखू अशा थेट इशाराच राजू शेट्टींनी दिलाय... दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला दर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी मागणी शेतकरी करतायत.....मात्र मराठवाड्यात कारखानदार ऊस दरवाढीसाठी का तयार नाहीत? पाहूयात...
पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकुल हवामानामुळे ऊसाचं उत्पादन जास्त आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील साखर उताऱ्यात सव्वा ते दीड टक्क्यांचा फरक आहे
पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा साखर उतारा सरासरी 11.5% ते 13% पर्यंत असतो. याचा अर्थ 100 क्विंटल ऊसापासून 11.5 ते 13 क्विंटल साखर तयार होते.
याउलट मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अनियमित असल्यानं ऊसाच्या उत्पादन तुलनेनं कमी आहे.
मराठवाड्यातील ऊसाचा सरासरी साखर उतारा 9.5% ते 10.5% इतकाच मिळतो.
त्यामुळे दोन्ही विभागांना सरसकट एकच दर देणे शक्य नसल्याचं कारखानदारांचं म्हणणंय.
दरम्यान एफआरपीचे सूत्र, साखरेचे उत्पादन, उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न आणि कारखान्यांची आर्थिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करूनच दर निश्चित करायला हवा, असे मत शुगर एक्सपर्ट यांनी व्यक्त केलयं... एका बाजूला शेतकरी ऊस दर वाढीची मागणी करत असल्यामुळेकारखानदार 500 ते 700 रुपये अनुदानाची मागणी करतायत...मात्र सरकार आता शेतकरी आणि कारखानदार या दोघांचेही हित जपणारा व्यवहार्य तोडगा काढणार का? कारखान्यांना अनुदान देणार का? ऊस दर वाढीची राज्यातील आंदोलनं थांबणार की पेटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.