Mumbai Goa Vande Bharat Start Date Saam TV
मुंबई/पुणे

Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, PM मोदी या दिवशी दाखवणार हिरवा झेंडा

Mumbai Goa Vande Bharat Start Date: मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

Satish Daud

Mumbai Goa Vande Bharat Start Date: मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ जून रोजी देशातील पाच एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यामध्ये मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

ओडिशा अपघातामुळे वंदे भारतचे लोकार्पण रद्द

मुंबई-गोवा  वंदे भारत (Mumbai-Goa Vande Bharat Express) एक्सप्रेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जून रोजी होणार होते. मात्र, ओडिशाच्या बालासोरमधील रेल्वे अपघातामुळे हा लोकार्पण सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. पंतप्रधान मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते.

मुंबई-वंदे भारत ट्रेन २६ जूनला सुरू होणार!

मात्र ओडिशात झालेल्या भीषण अपघातामुळे हा उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम तुर्तास रद्द करण्यात आला. दरम्यान, आता पुन्हा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भोपाळमधून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास सुखकर

मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषता कोकणवासियांना या एक्सप्रेसची विशेष आतुरला लागून आहे. या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन केव्हा सुरू होते? याकडे कोकणातील प्रवासी विशेष लक्ष ठेवून आहेत. वंदे भारत ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट किती?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर जाहीर केले होते. यामध्ये एसी चेअरसाठी १ हजार १०० रुपये ते १ हजार ६०० रुपये मोजावे लागतील. तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी २ हजार ते २ हजार ८०० रुपयांच्या जवळपास राहिल असं प्रशासनाने सांगितलं होतं.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचं वेळ काय?

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला एकूण ८ डब्बे असणार आहेत. ही एक्सप्रेस इतर वंदे भारतप्रमाणे दिवसाच धावणार आहे. शुक्रवारचा अपवाद वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी इथून सुटेल. तर गोव्यातील मडगाव इथे दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी पोहचेल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT