खुशखबर! मुंबईतील ५०० चौरस फूटांखालील घरांना मिळणार सरसकट करमाफी ... Saam Tv
मुंबई/पुणे

खुशखबर! मुंबईतील ५०० चौरस फूटांखालील घरांना मिळणार सरसकट करमाफी ...

जर मुंबईत (Mumbai) तुमचं घर ५०० चौरस फुटांपेक्षा लहान असेल तर तुम्हाला त्या घराचा कर अथवा घरपट्टी भरावी लागणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईत आपल्या हक्काचं घर घ्यायचं असल्यास त्या घराचा दरवर्षीचा कर देखील विचारात घ्यावा लागतो. पण, आता घराच्या घरपट्टीचा (House tax) विचार करावा लागणार नाही. जर मुंबईत (Mumbai) तुमचं घर (Home) ५०० चौरस फुटांपेक्षा लहान असेल तर तुम्हाला त्या घराचा कर अथवा घरपट्टी भरावी लागणार नाही. कारण लवकरच ५०० चौरस फुटांपेक्षा लहान असलेल्या घरांवरील कर हा सरसकट माफ करण्यात येणार आहे, महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) हा महत्वपुर्ण निर्णय मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. (Good news for Mumbaikars! Houses under 500 square feet in Mumbai will get total tax exemption)

हे देखील पहा -

आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील ५०० चौरस फूटाखालील घरांना सरसकट करमाफी देण्याचा निर्णय लवकरच महाविकास आघाडी सरकार घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. खरंतर मुंबईतील ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना करमाफी (Tax exemption) देण्याचं आश्वासन शिवसेनेनं निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. मात्र अद्यापही हे आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे यंदा शिवसेनेला आपण दिलेलं आश्वासन पुर्ण 'करुन दाखवायचं' आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी लवकरच निर्णय घेणार असल्याचे विधानसभेत आश्वासन दिले आहे.

महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. दरवर्षी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा कर हा पालिकेला मिळणार नसल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट होणा आहे. मात्र आगामी महापालिकेच्या निवडणुकांचा विचार करता आणि शिवसेनेने दिलेलं वचन अशा दुहेरी दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोलंल जातंय. याआधी ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतही असा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामुळे पालिकेला कोट्यवधींचा फटका बसला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

Viral Video: किळसवाणा प्रकार! रेल्वेमध्ये वापरतायत खरकटे प्लेट्स अन् डबे; VIDEO व्हायरल

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

SCROLL FOR NEXT