"सर्व आमदारांना बोलावून व्याख्यान करायला हवे ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेल"- फडणवीस

सभागृतील अनेक आमदारांकडून असभ्य वर्तन करत सभागृहाच्या आचारसंहितेचा भंग करण्यात आला.
"सर्व आमदारांना बोलावून व्याख्यान करायला हवे ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेल"- फडणवीस
"सर्व आमदारांना बोलावून व्याख्यान करायला हवे ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेल"- फडणवीसSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले. मात्र सभागृतील अनेक आमदारांकडून सभागृहाच्या आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग करण्यात आला. पंतप्रधानांची (PM Modi) नक्कल करण्यापासून ते पर्यावरण मंत्र्यांची (Aditya Thackeray) टिंगल करण्यापर्यंत अशा अनेक अशोभनीय घटना सभागृहात आणि विधान भवन परिसरात घडल्या. याबाबात आज विधान सभेत विचार मंथन करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षातील आमदारांनी सभागृहाच्या आचारसंहितेचे समर्थन केले. ("All MLAs should be called and given lectures which will improve their behavior" - Fadnavis)

हे देखील पहा -

याबाबत विधान सभेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी जे मत मांडले आहे त्याला माझे समर्थन आहे. आपल्या खासगी आयुष्यात कसेही वागू, पण या ठिकाणी आपण जनतेचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. कायम आपण आपला दर्जा ठेवला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कायदे मंडळाचे महत्व समजले पाहिजे. 12 कोटी जनतेच्या आयुष्यात सकारात्मक काम करण्याची संधी मिळालेली आहे असं म्हणत फडणवीसांनी सभागृहाच्या आचारसंहितेचे समर्थन केले. मात्र पुढच्याच क्षणी त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची खंत बोलून दाखवली. ते म्हणाले की, सभागृहात तणावाच्या गोष्टी घडतात, कधी-कधी राग येऊ शकतो. किमान उपमुख्यमंत्री यांना जाणीव आहे की, बारा-बारा महिन्यांसाठी सदस्यत्व रद्द करणे हे चुकीचे आहे असं फडणवीस म्हणाले.

"सर्व आमदारांना बोलावून व्याख्यान करायला हवे ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेल"- फडणवीस
सभागृहात कुणी चुकलं तर चार तास बाहेर ठेवा, 12 महिने ठेवू नका; अजित पवारांचा भाजपला टोला

पुढे ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत फासावर लटकवलं नाही पाहिजे. याकडे देखील लक्ष द्यायला हवं. छोट्या-मोठ्या शिक्षा देऊन समज द्यायला हवी. पुस्तक मी वाचले फक्त, त्यात काही सुधारणा झाली पाहिजे. ही पुस्तिका सदस्यांनी वाचावी. सर्व आमदारांना बोलावून व्याख्यान करायला हवे ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेल असा सल्लाही त्यांनी सभागृहात बोलताना दिला आहे.

Edited By: Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com