Western Railway  Saam TV
मुंबई/पुणे

Western Railway: विरारकरांसाठी खुशखबर! १५ डब्यांच्या २०० पेक्षा जास्त लोकलफेऱ्या वाढणार, प्रवास होणार सुखकार

Western Railway Local Services: पश्चिम रेल्वे आपल्या १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवून ती २०९ वर करणार आहे. याचा विरारकरांना चांगला फायदा होणार आहे.

Priya More

पश्चिम रेल्वे मार्गावरून लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विरारवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकारक होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकलफेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विरारकरांना याचा चांगला फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वे आपल्या १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवून ती २०९ वर करणार आहे. त्याचसोबत चर्चगेट आणि विरारदरम्यान उपनगरीय कॉरिडॉरवर १० अशा लोकलसेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे व्यस्त मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी १२ डब्यांची लोकलसेवा देखील जोडल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या १० विद्यमान लोकल १५ डब्यांच्या चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचा १५ वर्षांचा प्रवास -

२००९ - पश्चिम रेल्वेने दादर आणि विरार दरम्यान जलद मार्गावर १५ डब्याची लोकल सेवा सुरू केल्या.

२०११ - प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची लांबी वाढवल्यानंतर चर्चगेटपर्यंत सेवांचा विस्तार केला.

२०२१ - धिम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल सेवा सुरू केल्या.

२०२४ - लोकल सेवांची संख्या २०० च्या पुढे घेऊन जाणार.

पश्चिम रेल्वे मार्गावरील आताच्या लोकल फेऱ्या -

- १५ डब्यांची लोकल फेऱ्या - २०९

- १२ डब्यांची लोकल फेऱ्या - १,१९७

- एकूण लोकल फेऱ्या - १,४०६ फेऱ्या

- यामध्ये एसी लोकलच्या ७९ फेऱ्यांचा देखील समावेश आहे.

- आधी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या - १,३९४

प्लॅटफॉर्मसाठी ७० कोटींचा खर्च -

या विस्ताराला पश्चिम रेल्वेने बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामाला पाठिंबा दिला आहे. सहाव्या मार्गिकेचा कांदिवलीपर्यंतचा भाग ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. असे झाल्यावर पश्चिम रेल्वे जलद मार्गावर जास्त लोकल सेवा देईल. वेस्टर्न रेल्वे प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ७० कोटी रुपये खर्च करत आहे. अंधेरी ते विरारदरम्यानच्या १४ स्टेशनवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू आहे. पश्चिम रेल्वे अंधेरी आणि विरार दरम्यान १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तारित करण्यासाठी ७० कोटी रुपये खर्च करत आहे. या स्थानकांदरम्यान १५ डब्यांच्या लोकल सेवा धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.

अपघातांचा धोका कमी करणे हा उद्देश -

महत्वाचे म्हणजे, १५ डब्यांच्या लोकल दादर आणि चर्चगेट स्टेशनदरम्यान ज्या रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी कमी आहे त्याठिकाणी थांबणार नाहीत. तर, रेल्वे स्थानकांवरील जागेच्या अडचणींमुळे चर्चगेटच्या दिशेने अंधेरीच्या दक्षिणेकडे १५ डब्यांच्या लोकलसेवा चालवणे अशक्य आहे. जरी पश्चिम रेल्वेने अशा सेवा सुरू केल्या तरी गाड्यांना स्थानकांवर दुहेरी थांबे आवश्यक असतील. ज्यामुळे वक्तशीरपणाला अडथळा येईल. २०१५ मध्ये रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला १२ डब्यांची लोकल १५ डब्यांची करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले होते. गर्दी कमी करणे आणि अपघातांचा धोका कमी करणे हा यामागचा उद्देश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT