Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांची नियुक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचं नागपुरात ढोल ताशाचा गजरात स्वागत

बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख फिडे महिला विश्व चॅम्पियन बनल्यानंतर नागपुरात आलीय. नागपूर विमानतळावर ढोल ताशाचा गजरात स्वागत केलं जाणार आहे.

जेएनपीटी उरण ते बेलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी

पाच ते सहा किलोमीटरच्या रांगाच रांगा

नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी होत आहे

तसेच महामार्गावर खड्ड्यात खड्डे पडले आहेत

नवी मुंबई विमानतळाची सध्या काम सुरू असल्यामुळे त्याचाही परिणाम वाहतुकीवर सध्या होत आहेत

Pune : पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट आलं आहे.

मुठा नदीच्या प्रवाहात शिवणे पुलाजवळ हवेली आपत्ती व्यवस्थापनचे पाच जण अडकले

त्या पाच जणांना वाचविण्यासाठी PMRDA अग्निशमन दलाला पाचारण

नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात वकीलाला मारहाण

श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयात वकीलास मारहाण...

सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच वकिलाला मारहाण

वकील दिलीप औताडे यांना विरोधी पक्षकार अभिजित पाथरकर याच्याकडून मारहाण

सुनावणी दरम्यान उलट तपासणीवेळी विरोधी पक्षकारने केली मारहाण...

पोलिसांनी हस्तक्षेप करत अभिजीत पाथरकर याला घेतले ताब्यात.

अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर या ठिकाणी असलेल्या कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. यामुळे 7 दुचाकी अणि 2 रिक्षाचे नुकसान झालं आहे. ही भिंत 95 फूट लांब अणि 12 फूट उंच आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सदर ठिकाण धोकापट्टी लावून बंद करण्यात आला आहे.

अमरावतीत भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

अमरावतीत भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर तिघी गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित.

राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत होणार बैठक

महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असून पुणे जिल्ह्यामधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार बैठक

पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

गडचिरोली आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

मागील महिण्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूर वारी करण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी गेली होती ही पालखी पायी प्रवास करीत आषाढी ला पंढरपूरात पोहोचली व वारकऱ्यांनी दर्शन घेत संत गजानन महाराज यांचा मुखवटा विथुरायच्या पायी लागून परतीच्या मार्गाला पालखी लागली आता खामगाव येथे संत गजानन महाराज पालखी येऊन पोहोचली असून त्या पालखीचे स्वागत माजी आमदार दिलीप सानंदा यांनी केले आहे .. आज मुक्काम खामगांवात असून उद्या सकाळी 5 वाजता पालखी शेगाव कडे प्रस्थान करेल....

तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद , पुरातत्व खात्याकडून काम सुरू

एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार

देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा ,अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची मंदिर संस्थानची माहिती

तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

रायगडच्या माणगावमध्ये भरवस्तीत बिबट्याचा संचार

रायगड जिल्ह्यात बिबट्याच्या मुक्त संचाराच्या घटना वाढत असून माणगावमधील कशेणे गावातील घराच्या दरवजात बिबट्या आल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. कशेणे गावातील गणपत मुंढे यांच्या घरातील हि घटना आहे. या पूर्वी बिबट्याने कुत्र्याला मारल्याची घटना देखील कशेणे गावात घडली आहे. नागरी वस्तीत बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

पिडीत तरुण शेतक-याने रक्ताने लिहिले पोलिस महासंचालकांना पत्र

नाशिकच्या येवला तालूक्यातील नगरसूल येथिल कृष्णा डोंगरे या तरुण शेतक-याने आपल्या रक्ताने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र दिले आहे.आपण शेतक-यांच्या मागण्यांसाठी सतत विरोधात आवाज उठवला तसेच गावातील एका शाळेच्या दुरावस्थेचा व्हिडीओ काढला त्यामुळे आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले.शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,लंजय राऊत यांनीही शेतक-याला न्याय द्यावा अशी मागणी केली मात्र अद्याप पर्यंत कुठलीही उच्चस्तरीय चौकशी झाली नसल्याने डोंगरे यांनी रक्ताने पत्र लिहित जर न्याय मिळणार नसेल तर माझ्यासह कुटूंबाला गोळ्या घालून ठार मारा असे पत्रात नमूद केले आहे.

घाटकोपरमध्ये बर्गरच्या दुकानाला आग, मोठी दुर्घटना टळली

घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या श्रद्धानंद रोड वरील एका बर्गर च्या दुकानाला भीषण आग लागली होती. बॉंबे बर्गर असे या दुकानाचे नाव आहे. काही वेळा पूर्वी या दुकानातून धूर येऊ लागला. काही वेळातच या ठिकाणी आगीचे भडका उडाला. यातील कर्मचारी बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग आजूबाजूच्या दुकानात पसरली नाही. मात्र या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

भीमा नदी पात्रात उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारकवठे, अरळी, औज-मंद्रुप येथील भीमा नदी पात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी वाढल्याने विद्युत पंप काढताना शेतकऱ्यांची दिवसभर धांदल उडाली. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सुमारे एक लाख क्युसेस पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाची असलेले तीनही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने कर्नाटकशी असलेला संपर्क तुटला आहे.भीमा नदी पात्रावरील बंधारे बुडाल्यामुळे कर्नाटकातील उमरज, गोविंदपूर, निवरगी, दसूर, शिरनाळ यासह अन्य गावांचा जिल्ह्यातील तेलगाव-भीमा, भंडारकवठे, औज-मंद्रुप येथील नागरिकांचा संपर्क सध्या तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नदीकाठी न जाण्याचा इशारा दिला आहे.

पुणे - मुजुमदार सन्मान सोहळा

सकाळ माध्यम समूहातर्फे डॉ शां.ब. मुजुमदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आज विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने "ज्ञानपर्व" या विशेषअंकाचे प्रकाशन राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार उपस्थित होते. पुण्यातील सिंबोयासिस विश्वभवन हॉल या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

"ताईंची" बदली करू नका, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पुण्यातील हडपसर मधील शाळेच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना भावनिक पत्र

पुण्यातील साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिकेची बदली करू नका, म्हणून विनंती पत्र

ताई चांगले शिकवतात, त्यांची बदली नका करू शिक्षिकेसाठी तिसरीतील विद्यार्थ्यांचा टाहो

पुण्यातील हडपसर येथील साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील बाईंची बदली झाली हे कळताच इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी हमीद सुयोग बेंद्रे याने पत्र लिहिलं आहे

शरद पवार यांना "ताई चांगले शिकवतात, त्यांची बदली करु नका, त्या आम्हाला ओरडत नाही" असे या चिमुकल्याने पत्रात नमूद केलंय.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय

Manikrao Kokate: छावा संघटना आक्रमक, कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी

छावा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे. दादांचा वादा खोटा.. अजित पवार क्या हुआ तेरा वादा, अशा घोषणा छावा संघटना देत आहे.

Borivali: बोरिवली पश्चिमेत भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी

बोरिवली पश्चिम भाजी मंडईत धंदा लावण्याच्या जागेवरून भाजी विक्रेत्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सकाळच्या वेळेस ग्राहकांची गर्दी असताना हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला.एकजण जखमी, बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कल्याणमधील तरुणीला मारहाणप्रकरणी आरोपीच्या भावाचा जामीन अर्ज फेटाळला

रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरण

प्रकरणातील दुसरा आरोपी गोकुळ झा यांचा भाऊ रणजीत झा याचा जामीन अर्ज कल्याण कोर्टाने फेटाळला

पीडित तरुणी स्वतः कोर्टात हजर राहून आरोपी विरोधात दिले प्रतिज्ञापत्र

आरोपीकडून जीविताला धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र पीडितेने कोर्टाला केले सादर

पीडितेच्या वकिलांनी आरोपी विरोधात जोरदार युक्तिवाद केल्याने आरोपी रणजित झा याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील माहिती

पुणे शहरात 2023 - 2024 या वर्षात 563 मिमी पाऊस

2024- 2025 या वर्षात 1311 मिमी पाऊस

पर्यावरण अहवालातील या आकड्यांवरून पावसाचे प्रमाण बदलत असल्याचे चित्र स्पष्ट

पावसाच्या बदलत्या स्वरूपाप्रमाणे शहराच्या कमाल आणि किमान तापमानात सुद्धा वाढ

2024- 2025 या वर्षात कमाल तापमान 41.8 अंश तर किमान तापमान 7.8 अंश

Dhule: धुळे जिल्ह्यातील 12 पैकी 4 धरण झाले ओव्हरफ्लो

धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील 12 पैकी 4 धरण ओव्हरफ्लो झाले आहे, सुलवाडे 30 तर अक्कलपाडा प्रकल्प 82 टक्के भरल्याने टप्या टप्यात पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, गत वर्षांपेक्षा यंदा पहिल्यांदाच चार प्रकल्प जुलैअखेरपर्यंत शंभर टक्के क्षमतेने भरल्याने पाणी टंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे.

नवी मुंबईत बनावट डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची १ लाखांची फसवणूक

वाशी कोपरी गावात मेस चालवणाऱ्या ३८ वर्षीय महिलेची तब्बल १ लाख रुपयांची फसवणूक तीन अनोळखी व्यक्तींनी बनावट डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने केली. ही घटना २८ जुलैच्या सायंकाळी घडली असून, तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक) सह कलम ३(५) (सामाईक हेतू) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

Nashik: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- सकाळी ११ वाजेपासून गंगापूर धरणातून १२३५ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

- धरणात नव्याने पाण्याची आवक होत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवला

- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार

Pune:  पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

पुणे -

पुणे सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना

सकाळी 9 च्या सुमारास घडली घटना

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची तीन दुचाकी, एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकला धडक.

धडकेनंतर कंटेनर आणि पिकप टेम्पो पलटी

अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही, 5 जण जखमी.2 जण गंभीर

Pune: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पोलिस आयुक्तलयात जाणार

पुणे -

थोड्याच वेळात रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे हे पोलिस आयुक्तलयात जाणार

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची घेणार भेट

प्रांजल खेवलकर यांच्यावर चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप खडसे कुटुंबाचा आहेकाल न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी प्रांजल खेवलकर याना दिली आहे

Pune: ऑपरेशन सिंदूरचे स्टेट्स पुण्यातील शिक्षिकेला भोवले

पुणे -

ऑपरेशन सिंदूरचे स्टेट्स पुण्यातील शिक्षिकेला भोवले

गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

जळत्या राष्ट्रध्वजाचा फोटो व्हॉट्स अप स्टेट्स ठेवल्याबद्दल आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत गुन्हा नोंद आहेत

हा गुन्हा रद्द करण्यासाठी या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली

पण काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे

Mumbai: मंत्री संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

मंत्री संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

निधीबाबतच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात आणखीन एक घोटाळा उघड

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात आणखीन एक घोटाळा उघड

ऐरोलीतील सुस्थितीतील उद्यान पुन्हा नूतनीकरण करण्यास घेतलं

गरज नसताना ही ४० लाखाच्या कामाची निविदा काढण्यात आली..

नागरिकांच्या सतर्कतेमुळे उद्यान अधिकाऱ्यांचा कारनामा उघड

४ अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस

Nashik: सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी वाढली

नाशिक -

- सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी वाढली

- गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ कायम

- सकाळी ११ वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

- ११ वाजेनंतर १२३५ क्यूसेक वेगानं गोदावरी नदीत सोडलं जाणार पाणी

- विसर्ग वाढवल्यानंतर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार

Pune: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

पुणे -

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

सिंहगड रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

उड्डाण पुलाच्या कामामुळे रस्ता झाला बारीक

सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

प्रशासनाचं मात्र सिंहगड रोड कडे पूर्णपणे दुर्लक्ष

रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त

अजून काही दिवस चालणार उड्डाणपुलाचं काम

Pune: प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

पुणे -

प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न...

हे सगळं प्रकरण प्रांजल केवळकरांवर ट्रॅप लावून केलं असल्याचा आरोप खेवलकर वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय....

प्रांजल खेवळकरांच्या वकिलांचा खळबळ जनक दावा....

ज्या महिलेचा पर्समध्ये हे कोकिण सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा खळबळ जनक दावा प्रांजल केवळकर यांची वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय....

Buldhana:  रोहित पवारांकडे मुलीने मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या

रोहित पवारांकडे मुलीने मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या

पवारांकडे मुलीने केला प्रश्नाचा भडिमार

शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुलगी झाली भाऊक

रोहित पवारानी मुलीच्या तोंडावरून हात फिरवत केले शांत

तर रोहित पवारानी घेतली शिक्षणाची जबाबदारी

Solapur: सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेच्या समर्थनात काँग्रेस आक्रमक भूमिकेत उतरली रस्त्यावर

सोलापूर -

- सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेच्या समर्थनात काँग्रेस आक्रमक भूमिकेत उतरली रस्त्यावर

- सोलापुरात भाजपा नंतर काँग्रेसचही आंदोलन,केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

- भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही देवेंद्र कोठे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केलं आंदोलन

Beed: वाल्मीक कराडचा समर्थक गोट्या गीतेचे कारनामे समोर

बीड -

वाल्मीक कराडचा समर्थक गोट्या गीतेचे कारनामे समोर

गोट्या गीते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी.

गोट्या गीतेवर बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे गोट्या सराईत गुन्हेगार.

Nashik: नाशिकच्या सटाण्यात ईडीची मोठी कारवाई

- नाशिकच्या सटाण्यात ईडीची कारवाई

- वसई विरारचे मनपा आयुक्तांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची कसून चौकशी

Delhi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी न्यायालयात हजर

अकराव्या क्रमांकावर प्रकरण सुनावणीसाठी

खामगाव येथे पालखीचा आगमन व शेवटचा मुक्काम..

आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहुन परतीच्या मार्गावर आहे व आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे. आज खामगाव येथे या पालखीचा आगमन व शेवटचा मुक्काम असेल व उद्या पालखी शेगाव येथे विसावणार आहे. त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवार कडून महाराजांना १लाख ११हजार १११ मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात.

अप्पर वर्धा धरणात केवळ 57 टक्केचं जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील व पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणात केवळ 57 टक्केच जलसाठा आहेत....या अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहर,बडनेरा शहर, तिवसा,मोर्शी,वरुड, रतन इंडिया, एमआयडीसी, यासह हिवरखेड, लोणी,राजुरा गावात पिण्याचा पाणी पुरवठा होतो. तसेच वर्धा नदी पत्रात या धरणातून पाणी सोडले जाते यातून हजारो हेक्टरवर शेतीचे सिंचन होते... मात्र भर पावसाळ्यात वर्धा नदीचे पात्र अद्यापही कोरड ठन आहे.

कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीने आनंद पोहण्याचा उपक्रम

दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीने आनंद पोहण्याचा हा उपक्रम राबविला जातो. त्या पार्श्वभूमीवर आनंद पोहोण्याचा हा उपक्रम आमणापूर ते भिलवडी घाट या दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पात्रामध्ये संपन्न झाला.यामध्ये भिलवडी येथील तब्बल ८० जलतरणपटूंनी सहभाग घेवून पोहण्याचा आनंद घेत, पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याची भिलवडी वासियांची परंपरा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

पूल वाहून गेल्याने एका महिलेला प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली होती. प्रसूतीनंतर पुन्हा गावाकडे परत जाताना त्याच गुडघाभर पाण्यातून एका दिवसाच्या बाळाला घेऊन प्रवास करावा लागले. छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूरमधील ही घटना आहे. सय्यदपूर येथील कोमल अजय सिरसाठ या महिलेला प्रसूतिवेदना होत असल्याने गुडघाभर पाण्यातून प्रवास करत आरोग्य केंद्रात जावे लागले होते. तिने सोमवारी रात्री गोंडस मुलीला लाडसावंगी आरोग्य केंद्रात जन्म दिला. मंगळवारी सुटी झाल्याने आई आणि बाळाला परत घरी जाताना गुडघाभर पाण्यातून जावे लागले. सय्यदपूर-लाडसावंगी या गावाला जोडण्यासाठी दुधना नदीवर मुख्यमंत्री सडक योजनेमधून पुलाला मंजुरी मिळाली होती. या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकत होते; परंतु संबंधित ठेकेदाराने व अभियंत्यांनी लक्ष न दिल्याने पुलाचे काम पूर्ण झाले नाही. सय्यदपूर गावाला तात्पुरत्या स्वरूपात चार नळकांडी टाकून थातूरमातूर पूल तयार करण्यात आला होता; परंतु शनिवार, २६ जुलै रोजी दुधना नदी उगमक्षेत्रात व लाडसावंगी परिसरातील गावात जोरदार पाऊस झाल्याने रात्री आठ वाजता मोठा व पहिला पूर येताच तात्पुरता बनवलेला पूल वाहून गेला. सय्यदपूर गावात जाणारा एकमेव पूल वाहून गेल्याने नागरिकांसह विद्यार्थी, रुग्णांचा लाडसावंगीशी संपर्क तुटला. सोमवारी शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी गुडघाभर पाण्यातून शाळा गाठली. मात्र पाल्य शाळेत जाताना व परत येण्याच्या वेळेत नदीकाठी येऊन थांबण्याची वेळ पालकांवर आली आहे.

थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान गोरेगाव जवळ डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता थोड्याच वेळात लोकल वाहतूक सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय. दरम्यान सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ट्रक फ्रॅक्चर झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं. थोड्याच वेळात लोकल वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतय. दिलासादायक बाब म्हणजे बदलापूर ते मुंबई दिशेकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

- नागपुरातील महाल परिसरातील 22 घरांवर चालला बुलडोझर

- सी.पी. अँड बेरार ते रामजी पहेलवाल मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या 22 घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली

- नागपूर महानगर पालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाने ही कारवाई केली

- रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 22 घरांच्या कुटुंबीयांना पूर्वीच मोबदला देण्यात आला आहे

- त्यामुळे 22 घरे तीन पोकलेन आणि दोन जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आली

सातशे वर्षापासून भरते कंधार तालुक्यात नागबर्डी येथे नागदेवतेची यात्रा

नांदेडच्या कंधार तालुक्यातील गुंडा, दिंडा, बिंडा, या तीन गावाच्या परिसरात असलेल्या नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची यात्रा भरते. या यात्रेला सातशे वर्षाची परंपरा असल्याचे येथील गावकरी सांगतात.दरम्यान बंगाल प्रदेशातून आलेल्या बहिण भावाचे वास्तव्य या माळरानावर होते.एकेदिवशी याच माळरानावर भावाला नागाने दंश केल्याने तो मृत्यू पावला. बहिणीने मृत्यू पावलेल्या भावाला माळरानावरील लिंबाच्या झाडाच्या पाल्याचा रस पाजला आणि भाऊ जिवंत झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून या नागबर्डी येथे पंचक्रोशीतील भाविक नागपंचमीच्या दिवशी दर्शनसाठी येत असतात. विशेष म्हणजे या परिसरात लिंबाचे एकही झाड तोडल्या जात नाही.त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देणारे ही यात्रा मानली जाते.

ज्ञानेश्वरी मुंडे सह शिष्ट मंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची उद्या भेट मुख्यमंत्र्यांकडून भेटीसाठी वेळ

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व संपूर्ण मुंडे कुटुंबियांनी केली होती त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी अशी ही मागणी त्यांनी केली होती यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ज्ञानेश्वरी मुंडे व शिष्टमंडळाला भेटीसाठी उद्या वेळ देण्यात आला असून शिष्टमंडळात परळीतून चार वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत.

Maharashtra Live News Update: वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा

वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा

अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळेत लोकल वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

आज माळीण दुर्घटनेला ११ वर्ष पूर्ण – आठवणींच्या ढिगाऱ्यातून पुन्हा एकदा मन हेलावलं...

माळीणप्रमाणेच पुढे तळीये आणि इर्शाळवाडी गावांवरही अशाच निसर्गकोपाचा कहर कोसळला. या दुर्घटनांनी कित्येक घरं उद्ध्वस्त केली, अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली.आज माळीणमध्ये उभ्या असलेल्या स्मृतिस्तंभाजवळ त्या हरवलेल्या चेहऱ्यांच्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक माणसाच्या नावाने एक झाडं लावण्यात आलंय, गाव पुनर्वसितही झालंय... पण हरवलेली माणसं, त्यांची माया, त्यांचा श्वास... तो परत मिळणं अशक्यच.पुनर्वसनाची कामं झाली, घरं मिळाली, पण मनांचं पुनर्वसन...? ते अजूनही अपूर्णच आहे. आजही त्या दिवसाची आठवण झाली की गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि माळीणच्या डोंगरात त्या दिवसाचा घनघोर अंधार अजूनही दाटून राहिलाय.ही आठवण... ही वेदना... ही शोकसभा... आजही प्रत्येक माळीणवासियाच्या हृदयात खोलवर जिवंत आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं गंगापूर धरण ७६ टक्के भरलं

- सकाळी ११ वाजेपासून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवणार

- सकाळी ११ वाजेपासून धरणातून ६०३ ऐवजी १२३५ क्यूसेक वेगानं सोडणार पाणी

- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता

- पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार

- नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

- सध्या जिल्ह्यातील १४ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात सुरू आहे पाण्याचा विसर्ग

'वाघूर'मध्ये दमदार आवक; जळगावकरांना दिलासा

यंदा मॉन्सूनने जुलैच्या सुरुवातीलाच खंड दिला होता. त्यामुळे खरीप पिके कोमेजली होती. परंतु जुलैच्या शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असून, जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पात प्रथमच दमदार आवक झाली आहे.

शहराला पाणीपुरवठा वाघूर प्रकल्पात मे अखेरीस ६३ टक्क्यांपर्यंत उपयुक्त जलसाठा होता. आतापर्यंत मॉन्सूनच्या ५० दिवसांत शहर तसेच तालुका परिसरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मात्र आवकच झालेली नव्हती. गेल्या दोन, तीन दिवसांपासून अजिंठा डोंगर व वाघूर उगम क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १८ मिलिमीटर पावसाची नोंदीसह प्रथमच १.५० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पातळीत दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत उपयुक्त पाणीसाठा ६५.२० टक्क्यांवर पोचला आहे.

रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली एमआयडीसी रस्त्याची मलमपट्टी

बदलापुरातल्या शिरगाव परिसरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गाची दुरवस्था झालीय. खड्ड्यांमुळे या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलय. दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनानं खड्ड्यांमध्ये दगड-विटा टाकून वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय. कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहनं ये-जा करतात. बदलापुरातल्या शिरगाव परिसरात या रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला समांतर गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलय. मात्र एमआयडीसी प्रशासनाला त्याचं जराही सोयर सुतक नाही. या रस्त्याची सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये दगड-विटा टाकून वरवरची मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहतय का? असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ

बीडच्या मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा आता न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे वाल्मीक कराड संदर्भात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता आणि या अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत वाल्मीक कराडला का दोष मुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आली आहेत त्यामध्ये वाल्मीक कराड हा टोळीचा मोरक्या असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली वाल्मीक कराड वर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल मागच्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल अवदा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे फोनवर धमकवणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब त्याचबरोबर डिजिटल इव्हिडन्स फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्यात येत नाही वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराडच या घटनेचा सूत्रधार असल्याचा आता निरीक्षणातून समोर आला आहे.

नांदेडमधील सीता नदीत आढळला अनोळखी मृतदेह

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील सीता नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सध्या मुदखेड पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीता नदीला पूर आला आहे. नदीच्या काठावरील झुडपात अडकलेल्या अवस्थेत हा मृतदेह पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. मुदखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Junnar-ओतूर पोलिसांची मोठी कामगिरी — ३८ गहाळ मोबाईल्स शोधून मूळ मालकांना परत

जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारींची दखल घेत ओतूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३८ मोबाईल्स शोधून काढलेत सदर मोबाईल मूळ मालकांच्या स्वा

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केलं आहे. सद्यस्थितीत २५०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी ४०० गाड्यांचे आरक्षण उत्सवापूर्वीच फुल्ल झालं आहे.यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात ५००० जास्त गाड्या येणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून २५०० जादा गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मागीलवर्षी २२०० गाड्या सोडण्यात आल्या होत्या, यावर्षी त्यात ३०० गाड्यांची वाढ करण्यात आली आहे.

"बारमध्ये 'महाराष्ट्र शासन' फाईल्सवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या चामोर्शीच्या अभियंत्यास केले निलंबित

एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत एक सरकारी अधिकारी "महाराष्ट्र सरकार" असा शिक्का असलेल्या अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

देवानंद सोनटक्के असे या अधिकाऱ्याचे नाव असून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आहे

या खुलाशानंतर अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

ही घटना सार्वजनिक होईपर्यंत प्रशासन गप्प का राहिले याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नागपूरच्या मनीषनगर येथील एका बारमध्ये तीन जण मद्यपान करत असताना आणि "महाराष्ट्र सरकार" असे लिहिलेल्या मोठ्या सरकारी कागदपत्रांच्या गठ्ठ्यावर स्वाक्षरी करताना दिसले, हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि फौजदारी गुन्हा दाखल होणार का यावर लक्ष ठेवले जात आहे.

 महाड MIDC मध्ये पुन्हा एका बंद कारखान्यावर छाप

किटामाईन या आमली पदार्थाच्या कोट्यावधीच्या कारवाईनंतर महाड MIDC पोलिसांनी पुन्हा एका बंद कंपनीवर छापा मारला आहे. हि कारवाई पोलिस आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने एकत्रितरित्या केली आहे. महाड MIDC तील डि झोनमध्ये सविता नावाने हि कंपनी सुरु आहे. बाहेरून बंद, पडक्या - मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणतीही सुरक्षा नाही. अस्थाव्यस्त रसायनांची साठवणूक, जल आणि पाणी प्रदूषणांच्या मानांकनांच उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तशा स्वरूपाचा गुन्हा सविता कंपनी प्रशासना विरोधात दाखल केला आहे. या कारवाईत कंपनीतील रसायन, उत्पादन यांचे नमुने गोळा करण्यात आले असून त्याच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या कारखान्यात देखील प्रतिबंधित उत्पादन घेतल जात असल्याचा प्रथमिक अंदाज आहे.

सततच्या पावसाने जंगलातील झरे मोकळे झाले, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाने ओढे वाहिले

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, या पावसामुळे जंगलातील नैसर्गिक रित्या वाहणारे झरे मोकळे झाल्याने नदी व नाल्यांना येऊन भिडले आहेत, सध्या औंढा तालुक्यातील गांगलवाडी दुघाळा ,सिद्धेश्वर परिसरात रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या पाण्याचा खळखळणारा आवाज मंत्रमुग्ध करून जात आहे.

Shirur-रांजणगाव-गणेगाव आणि पाबळ-राजगुरुनगर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य,

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव ते गणेगाव आणि पाबळ ते राजगुरुनगर हे दोन महत्त्वाचे मार्ग सध्या खड्ड्यांनी भरले असून, या खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि ग्रामीण नागरिक यांचा रोजचा प्रवास धोकादायक बनला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: तीन ठिकाणी छापे बारा किलो गांजा आणि ३.५६ लाखांचा गुटखा जप्त

पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडाकेबाज कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकून बारा किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह चार आरोपींना अटक केली आहे.

कारवाई क्रमांक १ – गांजाची तस्करी रोखली

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार तुषार बंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव व अंमलदार सागर धुमाळ हे शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना माहिती मिळाली की दोन इसम गांजासह आमदाबाद फाट्याकडे येणार आहेत.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळविल्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकासह लोणजवळ मळगंगा परिसरात सापळा रचला. काही वेळातच दोन इसम मोटारसायकलवर येताना दिसले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ४ किलो १८५ ग्रॅम गांजा सापडला.

पुण्यातील खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ प्रदूषण वाढले

उत्तम हवेचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुण्याचा प्रवास दिल्लीच्या दिशेने सुरू

खराब हवेचे दिवस वाढल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून स्पष्ट

सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात तीन दिवस हवेची गुणवत्ता वाईट म्हणजेच आरोग्यासाठी धोकादायक नोंदविण्यात आली

174 दिवस हवा मध्यम स्वरूपाची होती पण त्यातील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म ध्वनी करण्याचे प्रमाण जास्त होते

वर्षभरात पुण्यात केवळ 52 दिवस हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे समोर आला आहे.

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची सहा ऑगस्टला हरकतीवर सुनावणी

पुणे जिल्ह्यातील 73 गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणाच्या तहसीलदाराने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सुनावणी

जिल्ह्यातून 217 हरकती घेण्यात आले आहेत त्याचा अहवाल विभागीय त्यांना पाठवण्यात आला होता

सहा ऑगस्टला विभागीय आयुक्त यांच्यासमोर या हरकतीच्या सुनावण्या होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com