Good News For Navi Mumbaikar Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Good News For Navi Mumbaikar: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको भूखंडांचे फ्री-होल्डमध्ये रूपांतर होणार आहे. ही योजना काय आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे घ्या जाणून...

Priya More

सिडको भूखंडांचे फ्री- होल्डमध्ये रूपांतर करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोकडून रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे फ्रीहोल्डमध्ये रूपांतर करण्यास आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणीसाठी सिडकोने विशेष समितीची स्थापना केली आहे. अर्जांवर आधारित प्रक्रिया लवकच सुरू होणार आहे.

या योजनेअंतर्गत सिडकोमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे विकसित केलेले गृहप्रकल्प तसेच १२.५ टक्के आणि २२.५ टक्के पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेले भूखंड या फ्री-होल्ड योजनेच्या कक्षेत येतील. संबंधित भूधारकांनी अर्ज सादर करून निश्चित केलेले रुपांतर शुल्क भरल्यास त्यांना कब्जेहक्क प्रदान करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, ज्या भूखंडांच्या करारनाम्यांमध्ये "अनर्जित उत्पन्न" भरण्याचा उल्लेख आहे. अशा प्रकरणांमध्ये भूधारकांना निश्चित शुल्काबरोबरच विहित अनर्जित रक्कम देखील भरावी लागणार आहे. अनुदानित अथवा सवलतीच्या दराने वाटप झालेल्या भूखंडांबाबतही अतिरिक्त निश्चित शुल्क आकारण्यात येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून ती केवळ लिजडीड असलेल्या भूखंडांपुरतीच मर्यादित राहणार आहे. एकदा भूखंड फ्रीहोल्ड झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या विक्री अथवा हस्तांतरणासाठी सिडको कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारणार नाही. तसेच, फ्रीहोल्ड रूपांतरानंतर संबंधित भूखंडाचा अधिकार अभिलेख व अद्ययावतीकरण राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागामार्फत करण्यात येणार आहे. सिडकोने सर्व पात्र भूधारकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT