Good News For Farmer Heavy Rain Start Next 3-4 Days in Maharashtra Weather updates  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Updates: सप्टेंबर महिन्याची सुरूवात पावसाने होणार; कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?

Maharashtra Weather Updates: येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates Latest News: गेल्या दोन आठवड्यापासून राज्यभरात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिके करपून चालली आहे. पाऊस नेमका कधी पडणार? असा चिंतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, अशातच हवामान खात्याने पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. (Latest Marathi News)

येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील (Rain Updates) असा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना ही दिलासा देणारी बातमी आहे.

हवामान खात्याने (Weather Updates) पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातून बहुतांश जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.

बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट पडल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. दरम्यान, राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढत असल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे मंगळवारी संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT