Home Accident saam tv
मुंबई/पुणे

Home Accident: शेल्फ फुटला अन् काचेचा तुकडा पायात घुसला, चालण्याची शक्यताच संपली होती, पण...! डॉक्टरांनी वाचवला तरूणाचा पाय

Achilles Tendon Injury: घरातील काचेच्या शेल्फचा अपघात 31 वर्षीय तरुणासाठी जीवघेणा ठरू शकला असता. अकिलीस टेंडन, स्नायू, मज्जातंतू आणि धमनी तुटल्यानंतर डॉक्टरांनी चार तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे पाय वाचवला. आता फिजिओथेरपीच्या मदतीने तो पुन्हा चालू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

घरात झालेल्या एका छोट्याशा अपघातामुळे 31 वर्षीय तरुणावर मोठं संकट ओढवलं. घरातील काचेच्या शेल्फला पाय लागल्याने शेल्फ फुटलं आणि त्याचे धारदार तुकडे पायात खोलवर घुसले. या अपघातात तरुणाच्या पायातील अकिलीस टेंडन (Achilles Tendon), पाच महत्त्वाचे स्नायू, दोन मज्जातंतू आणि एक मुख्य धमनी पूर्णपणे कापली गेली. त्यामुळे त्याच्या चालण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परंतु मेडिकव्हर हॉस्पिटलमधील प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. अतीव सिंग यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने चार तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तरुणाचा पाय वाचवला. त्यामुळे त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार आहे.

नवी मुंबईतील रहिवासी नमन (नाव बदललेले) यांच्यासोबत 23 जुलै रोजी हा अपघात झाला. घरातील काचेच्या शेल्फला पाय आदळताच ती फुटली आणि काचेचे तीक्ष्ण तुकडे त्यांच्या पायात खोलवर घुसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि तीव्र वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला ही साधी जखम असल्याचं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात पायाच्या आत मोठं नुकसान झालं होतं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाने प्रथम रक्तस्राव थांबवून त्यांची प्रकृती स्थिर केली.

याबाबत माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. अतीव सिंग म्हणाले, एमआरआय आणि सीटी अँजिओग्राफीसह करण्यात आलेल्या तपासणीत दुखापतीची तीव्रता स्पष्ट झाली. या अपघातात पायातील सर्वात मोठा स्नायुबंध असलेला अकिलीस टेंडन पूर्णपणे तुटला होता. तसंच फ्लेक्सर हॅल्युसिस लॉन्गस, पेरोनियस ब्रेव्हिस, पेरोनियस लॉन्गस, फ्लेक्सर डिजिटोरम लॉन्गस आणि टिबियालिस पोस्टेरियर हे पाच महत्त्वाचे स्नायू पूर्णपणे कापले गेले होते. त्याचबरोबर दोन मज्जातंतूंनाही गंभीर इजा झाली होती. पायाला रक्तपुरवठा करणारी पोस्टेरियर टिबियल धमनी देखील पूर्णपणे तुटली होती. काचेमुळे झालेल्या जखमा बाहेरून लहान दिसल्या तरी आतून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असू शकतं. त्यामुळे अशा जखमांमध्ये तातडीने उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं. आमचं उद्दिष्ट फक्त पाय वाचवणं नव्हतं, तर पायाची हालचाल, संवेदना, रक्तपुरवठा आणि रुग्णाचं दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरळीत करणं हेही होते.

दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास चार तास चाललेल्या या अवघड शस्त्रक्रियेत तुटलेला अकिलीस टेंडन दुरुस्त करण्यात आला. तसंच पाचही स्नायू पुन्हा जोडण्यात आले. पोस्टेरियर टिबियल आर्टरीना पुन्हा जोडून पायातील रक्तपुरवठा पूर्ववत करण्यात आला. याशिवाय टिबियल आणि सुरल या दोन्ही मज्जातंतूंचीही सूक्ष्म शस्त्रक्रियेच्या मदतीने दुरुस्ती करण्यात आली.

डॉ. सिंग पुढे म्हणाले, शस्त्रक्रियेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जखमेची सखोल तपासणी करण्यात आली. रक्ताभिसरण पुन्हा सुरू करण्यासोबतच पायाची हालचाल सुरळीत राहण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू, स्नायुबंध आणि मज्जातंतू यांची काळजीपूर्वक दुरुस्ती करण्यात आली. या सर्व रचना चालताना पायाला पुढे ढकलण्यासाठी महत्त्वाच्या असतात. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. पुढील काही महिन्यांत फिजिओथेरपी आणि पुनर्वसनाच्या मदतीने त्यांना हळूहळू ताकद, हालचाल आणि आत्मविश्वास पुन्हा मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत केवळ ऑपरेशनच महत्त्वाचं नसतं तर योग्य वेळी उपचार मिळणं आणि त्यानंतरचे रिहॅबिलीटेशन तितकेच आवश्यक असतं. काचेमुळे झालेल्या खोल जखमांकडे दुर्लक्ष करू नये. टेंडन, मज्जातंतू, धमनी किंवा स्नायूंना इजा झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावं. योग्य वेळी तपासणी आणि शस्त्रक्रिया झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येऊ शकतं.

रुग्ण नमन म्हणाले, हा अपघात काही क्षणांत घडला. सुरुवातीला मला ही साधी जखम वाटली होती. मात्र, नंतर पायातील महत्त्वाच्या भागांना गंभीर दुखापत झाल्याचं समजल्यानंतर मी आणि माझं कुटुंब खूप घाबरलो. मी पुन्हा पूर्वीसारखा चालू शकेन की नाही, अशी भीती वाटत होती. आता माझी प्रकृती सुधारत आहे. लवकरच कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकेन, अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली; अभिजीत दीपकेंनी केली सर्वात मोठी घोषणा! मोदी सरकारचं टेन्शन वाढलं

Maharashtra News Live Update: सीजेपी 'क्या बोलती पब्लिक' मोहीम राबवणार - अभिजीत दिपके

Abhijeet Dipke : आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय; अभिजीत दिपकेंच्या कार्यशैलीवर संशय, घरासमोर CJP आंदोलकांचा गोंधळ

Shivsena: शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी; फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२६ मधील संपूर्ण घटनाक्रम वाचा

Shiv Sena: शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात निकाल कधी लागणार, ठाकरेंच्या वकिलांनी वर्तवला अंदाज!

SCROLL FOR NEXT