Heart Attack Risk: आता अगोदरच समजणार हार्ट अटॅक येण्याचा धोका; फक्त ही 300 रूपयांची टेस्ट वाचवणार तुमचा जीव

ApoB रक्ततपासणी हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी उपयुक्त मानली जाते. LDL टेस्टपेक्षा ती अधिक अचूक माहिती देऊ शकते. ApoB टेस्ट म्हणजे काय, ती कोणासाठी आवश्यक आहे, खर्च किती आणि सामान्य पातळी किती असावी हे जाणून घ्या.
Heart Attack Risk
Heart Attack Risksaam tv
Published On

गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. त्यामुळे नियमित कोलेस्ट्रॉल तपासणीसोबतच आता डॉक्टर ApoB ही रक्ततपासणी करण्याचाही सल्ला देत आहेत. ही तपासणी स्वस्त, सोपी आणि भविष्यात हार्ट अटॅकचा धोका किती आहे याचा अंदाज लावण्यास मदत करणारी मानली जाते. त्यामुळे वेळेवर योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल करणं शक्य होतं.

ApoB टेस्ट म्हणजे नेमकी काय?

ApoB ही एक साधी रक्ततपासणी आहे. या तपासणीत रक्तातील अशा हानिकारक लिपोप्रोटीनची संख्या मोजली जाते जे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर तयार करू शकतात. हा प्लाक वाढत गेला तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असली तरी हे हानिकारक कण जास्त असू शकतात.

Heart Attack Risk
Infertility: प्लास्टिकच्या डब्यांपासून कॉस्मेटिक्सपर्यंत...; घरातील या वस्तू तुमच्या प्रजनन क्षमतेवर करतायत परिणाम! संशोधनातून धक्कादायक माहिती

LDL टेस्टपेक्षा ApoB टेस्ट कशी वेगळी आहे?

सामान्यपणे केली जाणारी लिपिड प्रोफाइल किंवा LDL तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सांगतं. मात्र ApoB टेस्ट शरीरात एकूण किती हानिकारक लिपोप्रोटीन कण आहेत याची माहिती देते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी अनेक तज्ज्ञ ही तपासणी अधिक अचूक मानतात.

कोणासाठी ही तपासणी आवश्यक आहे?

डॉक्टरांच्या मते प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी ApoB टेस्ट करून घ्यावी. विशेषतः मधुमेह असलेले, इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या असलेले, लठ्ठपणा असलेले, ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढलेले किंवा कमी वयात हार्टचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी ही तपासणी नक्की करून घ्यावी. तसंच LDL सामान्य असतानाही हार्ट अटॅकचा धोका असल्याची शक्यता असेल तरीही ही चाचणी उपयुक्त ठरते.

Heart Attack Risk
High Cholesterol: या ठिकाणी वेदना होत असतील तर सावध व्हा; शरीर देतंय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

ApoB टेस्टचा खर्च किती येतो?

ही तपासणी फार महाग नाहीये. बहुतांश खासगी लॅबमध्ये ApoB टेस्टसाठी साधारण ३०० ते ५०० रुपये खर्च येतो. वेगवेगळ्या लॅबनुसार हा खर्च थोडा कमी-जास्त असू शकतो. काही सरकारी रुग्णालयांमध्ये ही तपासणी मोफतही उपलब्ध असते.

ApoB चं प्रमाण किती असावं?

तज्ज्ञांच्या मते, ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे अशा व्यक्तींमध्ये ApoB चे प्रमाण ९० mg/dL पेक्षा कमी असणे योग्य मानले जाते. जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये ते ८० mg/dL पेक्षा कमी असावे. तर ज्यांना यापूर्वी हार्ट अटॅक आला आहे, त्यांच्यासाठी ApoB ची पातळी ६५ mg/dL पेक्षा कमी ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते.

ApoB वाढलेलं आढळल्यास काय करावं?

ApoB चे प्रमाण वाढलं असल्यास सर्वप्रथम जीवनशैलीत बदल करण गरजेचं आहे. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, जसं की ओट्स, डाळी आणि बीन्स यांचा अधिक समावेश करावा. रेड मीट, लोणी आणि जास्त सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ शक्य तितके कमी खावेत. नियमित व्यायाम करणंही तितकेच महत्त्वाचं आहे.

Heart Attack Risk
High Cholesterol: या ठिकाणी वेदना होत असतील तर सावध व्हा; शरीर देतंय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com