पुणे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी आज फुगेवाडी येथे येऊन विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. विषारी दारू हत्याकांडातील जे पण दोषी अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांच्यावर तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात आतापर्यंत पोलीस खातं आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवळपास 23 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच यापुढे राज्यात कुठेही हातभट्टीची अवैध दारू विकली जाणार नाही. त्याविषयी संबंधित खात्यांना कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान मनोज जरागे पाटील यांनी आजपासून कडक उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले जरांगे यांच्याशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे राज्य सरकारच्या वतीने बोलणं सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाविषयी पुढील एक-दोन दिवसात तोडगा निघेल. त्यांना जास्त दिवस उन्हात बसण्याची वेळ ओढवणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. अवघ्या ३० रुपयांत मिळणाऱ्या या दारूच्या सेवनामुळे अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दारूत 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळल्यामुळे हे मृत्यू तांडव घडल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'मिथेनॉल'चा अवैध साठा करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, भिवंडी परिसरातील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर धाड टाकून 'मिथेनॉल' या विषारी रसायनाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, याच कंपनीकडून पुण्याच्या विक्रेत्याने दारूत 'मिथेनॉल' मिसळले होते.
विषारी दारूमुळे प्राण गमावणाऱ्यांनी कर्नालसिंग विरका याचे फुगेवाडी येथील घरी हातभट्टीची दारु पिली. विरका याने योगेश वानखेडे नावाच्या इसमाकडून दारू मिळवली होती. योगेश हा उरळी कांचन येथील राजू प्रजापती याच्याकडून दारू आणून इतरांना पुरवठा करत होता. पुण्यातील घटनेत दारूत वापरण्यात आलेले 'मिथेनॉल' हे मे. रेक्स इंटरनॅशनल यांच्याकडून प्राप्त झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या कंपनीचे भिवंडी येथे असल्याचे कळताच अन्न आणि औषध प्रशासनाने या ठिकाणी धाड घातली. त्यावेळी संस्थेचे मालक अरुणकुमार चौबे, सक्षम व्यक्ती अभिषेक अरुणकुमार चौबे हजर नव्हते. चौकशी केली असता त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतल्याचे कळले. या कारवाईत एकूण ५९२९ किलोग्रॅम इतका साठा आढळून आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.