शरद पवार भाजपसोबत सत्तेत...; खासदार संजय राऊतांनी सगळंच सांगितलं|VIDEO

Sanjay Raut Statement On Sharad Pawar And BJP Alliance: शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाणार नाहीत, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आणि अजित पवार गटाच्या भूमिकेवर राऊत यांनी काय भाष्य केलं? पाहा संपूर्ण व्हिडिओ.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. शरद पवार हे इंडिया आघाडीचे मोठे स्तंभ आहेत. अजित पवार गटाने शरद पवारांसोबत यायचं की नाही, याचा निर्णय पवारच घेतील. मात्र, शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाणार नाहीत, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. शरद पवार यांच्याबाबत सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. पंतप्रधान मोदी फोन करून देश सांभाळण्याची भाषा करतात, मग आमचे पक्ष का फोडले, असा घणाघाती सवालही राऊत यांनी उपस्थित केला. शरद पवार यांची प्रकृती आणि उपचार सुरू असल्याने त्यांच्याशी सध्या फार चर्चा करण्याची परिस्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.